
Ekanth Shinde Shivsena: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआय या देशातील नामांकित संस्थेचे कल्याण शहरात होणारे सुसज्ज आयसीएआय भवन हे शहरासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काढले. चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेच्या इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून डॉ. शिंदे बोलत होते.
कल्याणात होणाऱ्या या चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेच्या सुसज्ज इमारतीचा लाभ केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर भिवंडी, शहापुरपासून थेट बदलापूर, कर्जतपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना आता सीए संबंधित शिक्षण- प्रशिक्षणासाठी मुंबईला न जावे लागता आता याच इन्स्टिट्युटमधून सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहे. आम्ही सर्व जण यापुढेही आपल्यासोबत असून एक चांगली संस्था याठिकाणी उभी करा असे आवाहनही खासदार.डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.