
प्रसिद्ध गायक सोनू निगमवर झालेल्या हल्ल्यामुळे चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर सध्या चर्चेत आले आहेत. ते ठाकरे गटाचे आमदार असल्याचं बोललं जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा कार्यक्रम टाळून शिंदे गटाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानेही ते चर्चेत आले होते.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं होतं. महापुरुषांचा अपमान, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, शेतकरी, बेरोजगारी, कर्नाटक सीमावाद अशा विविध प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीने मुंबईमध्ये महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या महामोर्चात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर अनुपस्थित होते.
मात्र त्याच वेळी फातर्पेकर शिंदे गटाच्या एका कार्यक्रमाला हजर राहिले होते. खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत शिंदे गटाच्या एका स्थानिक कार्यक्रमात ते दिसले. चेंबूरमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तेव्हाही आणखी एक आमदार फुटल्याची चर्चा सुरू झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.