सहा वर्षांच्या मुलीला झाली गरिबीची जाणीव...

नीलेश मोरे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

घाटकोपर - अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर... आधी हाताला चटके तवा मिळते भाकर... कवयित्री बहिणाबाईंची ही कविता हलाखीत जीवन जगणाऱ्यांच्या जीवनाचे सार सांगून जाते. संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नाही... चटके सहन केल्याशिवाय संसार होत नसतो, असे कवितेतून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न बोरिवलीत राहणाऱ्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीला बरोबर उमगला. सराया मोरीस नोरोन्हा असे तिचे नाव. तीन वर्षे तिने आपल्या पॉकेटमनीचे पैसे वाचवून पदपथावर संसार केलेल्या गरिबांना मिठाई आणि साड्यांचे वाटप करून त्यांची देवदिवाळी गोड केली.

बोरिवलीत आय सी कॉलनीत राहणाऱ्या सरायाला पदपथ आणि रस्त्यावर संसार मांडून राहणाऱ्या गरिबांच्या मुलांच्या जगण्याची अन्‌ त्यांच्या गरिबीची जाणीव होणे कौतुकास्पद आहे. वडील मोरीस यांच्याबरोबर सराया जेव्हा फिरायला जायची तेव्हा शिवाजीनगरमधील पदपथावर खेळणाऱ्या गरीब मुलांकडे पाहून व्यथित व्हायची. त्यांना राहायला चांगले घर, चांगले कपडे, चांगले अन्न का नाही? असे प्रश्‍न तिला अवघ्या तीन वर्षांतच पडायचे. त्यांच्यासाठी काही करता येईल का, असे आम्हाला ती सतत विचारायची. सराया आधी पॉकेटमनीतून चॉकलेट किंवा अन्य वस्तू विकत घेऊन पैसे खर्च करायची. मात्र, जेव्हापासून तिने शिवाजीनगर परिसरातील गरीब मुलांची गरिबी पाहिली तेव्हा त्यांना मदत करायचे ठरवले. तीन वर्षांपासून खाण्यासाठी दिलेले पैसे तिने एका डब्यात जमा केले. त्यातून जमलेल्या पैशांतून मुलांना तब्बल २५० किलो मिठाई वाटली. मुलांच्या आईला २५० साड्या देत ८ डिसेंबर रोजी देवदिवाळीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले, असे तिच्या वडिलांनी सांगितले. 

Web Title: Six-year daughter becomes aware of poverty

टॅग्स