मुंबईत ६० वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण: महत्त्वाचा निर्णय

काय आहे हा निर्णय?
Vaccine
VaccineSakal

मुंबई: राज्य सरकारने बुधवारी १८ ते ४४ वयोगटासाठीची लसीकरण मोहिम (Mumbai vaccination drive) तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटासाठी खरेदी केलेले १० लाख लसींचे डोस ४५ वर्षापुढील (Above 45 vaccination) व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत. ४५ वर्षावरील जवळपास २० लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. यात १६ लाख कोव्हिशिल्डचे डोस (covieshield dose) आहेत. (sixty plus in Mumbai can now walk in for second dose three days a week)

मागच्या आठवड्यात मुंबई महापालिकेने वॉक इन म्हणजे थेट लसीकरण केंद्रावरचे लसीकरण बंद केले होते. त्यासाठी आधी रजिस्ट्रेशन बंधनकारक केले होते. पण आता नियम थोडे शिथिल केले आहेत. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना थेट लस केंद्रावर जाऊन लस घेता येईल. पण सोमवार ते बुधवार असे तीनच दिवस ही सुविधा असेल. पुढच्या आठवड्यापासून नंतरच्या तीन दिवसांसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. रविवारी लसीकरण होणार नाही.

Vaccine
म्युकर मायकोसिस आजार: एका औषधाबद्दल सूचना

पुढचे काही दिवस ४५ वर्षापुढील वयोगटातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायला प्राधान्य देण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २० मे नंतर कोव्हिशिल्ड लसीचे १.५ कोटी डोस देण्याचा शब्द दिला आहे, असे टोपे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com