लाल रंगात रोहा न्हाले

अरविंद पाटील
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रोहा : शेतकरी कामगार पक्षाचा 72 वा वर्धापनदिन मेळावा शुक्रवारी (ता.2) रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलच्या भव्य प्रांगणात होणार आहे. त्यासाठी रोहा नगरी व आसपासचा परिसर सजला आहे. संपूर्ण शहरात लाल बावटा फडकत असल्याने शहर लाल रंगात न्हाऊन गेले आहे. 

या मेळाव्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभच रोह्यातून होणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 40 हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. 

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, अनंता वाघ, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, जिल्हा महिला आघाडी सदस्या कांचन माळी यांच्या नेतृत्वाखाली तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष जीवन देशमुख, उपाध्यक्ष नंदेश यादव, तालुका महिला आघाडी चिटणीस विनया चौलकर यांनी विभागवार कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन पूर्ण केले आहे. 

शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून शहरभर लाल बावटा फडकताना दिसत आहे. यापूर्वी 1990 मध्ये मेहेंदळे हायस्कूलच्या मैदानावर शेकाप वर्धापन दिन साजरा झाला होता.

2004 मध्ये रोहा तालुक्‍यात नागोठणे येथील दर्ग्याच्या समोरील मैदानात वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला होता. शेकाप आमदार धैर्यशील पाटील, आमदार पंडित पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात रोहा तालुक्‍यातील बहुसंख्य भाग येत असल्याने या वर्धापनदिन कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. पक्षाचे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका व जिल्हा पातळीवरील पक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाचे योगदान आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SKP anniversary today