मिरा-भाईंदरमधील झोपडपट्ट्या होणार रंगबिरंगी; परिसराचा होणार कायापालट

Slum in mira bhayandar
Slum in mira bhayandarsakal media

भाईंदर : झोपडपट्टी परिसर (Slum Area) म्हटले की अस्वच्छ्ता, बकालपणा असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते; मात्र झोपडपट्ट्यांचे हे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महापालिकेकडून (Mira bhayandar municipal corporation) केला जाणार आहे. यासाठी महिला बचतगटांचा सहभाग घेतला जाणार असून मुख्य रस्त्यांवर दर्शनी भागात असलेल्या झोपड्यांच्या भिंतींवर विविध प्रकाराची चित्रे, सजावट (Decoration) केली जाणार आहे.

Slum in mira bhayandar
अलिबाग: शासकीय कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप सुरू; ४० हजारपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा भाग म्हणून महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. शहर स्वच्छतेसोबतच झोपडपट्ट्यांच्या सुशोभीकरणाचाही त्यात समावेश आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेली अस्वच्छता, बकालपणा दूर करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. ‘झोपडपट्टी सुशोभीकरण’ या उपक्रमांतर्गत मिरा-भाईंदर महापालिकेकडून झोपड्यांचा कायापालट करण्यात येणार आहे. साधारणपणे किमान १०० झोपड्या असलेल्या भागाचा या उपक्रमांतर्गत कायापालट केला जाणार आहे.

मिरा-भाईंदरमध्ये सुमारे ३५ झोपडपट्टी परिसर आहेत. त्यात हजारो नागरिक वास्तव्य करतात. यातील निवडक १० भागातील झोपड्यांची निवड या उपक्रमासाठी केली जाणार आहे. मुंबईतील वरळी भागातील झोपड्यांसाठी या पद्धतीचा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदरमधील झोपड्यांचीदेखील रंगरंगोटी केली जाणार आहे.

Slum in mira bhayandar
मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; अमोल पाटील नगराध्यक्षपदी

बचत गटांना प्रोत्साहन

१) झोपडपट्टी भागामधील अंतर्गत मुख्य रस्त्यालगत असलेल्या झोपड्यांच्या भिंतींवर विविध प्रकारची चित्रे काढली जाणार आहेत. यात प्रामुख्याने वारली चित्रकला, निसर्ग सौंदर्य आदींचा समावेश असणार आहे. याशिवाय परिसराची स्वच्छता ठेवणे, कचरा इतरत्र न टाकणे आदी संदेशदेखील त्यातून देण्यात येणार आहेत.
२) मिरा-भाईंदर शहरात सुमारे १०० महिला बचत गट आहेत. या बचत गटांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमानिमित्त बचत गटांची स्पर्धादेखील घेतली जाणार आहे. पहिल्या क्रमांकाला १० हजार रुपये. दुसऱ्या क्रमांकासाठी सात हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये, अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
३) चित्र काढण्यासाठीचे रंग महापालिकेकडून पुरवण्यात येणार आहेत. तसेच चित्रे काढण्यासाठी मदत म्हणून महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात इतरत्र चित्रे काढणारे कलाकारही या बचत गटांना मदतीसाठी देण्यात येणार आहेत.

झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये सकारात्मक आणि स्वच्छतेची भावना निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने झोपडपट्टी परिसरातील कचरा कमी होऊन परिसर स्वच्छ होईल हा उपक्रमाचा उद्देश आहे.

- रवी पवार, उपायुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com