Mumbai News : ‘एसएनडीटी’त अभिरूप संसद

चर्चगेट परिसरातील एसएनडीटी कला व एस. सी. बी. विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती.
SNDT Womens
SNDT WomensSakal

मुंबई - एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकतीच राष्ट्रीय युवा संसद पार पडली. संसदीय लोकशाहीचे कामकाज कसे चालते ते समजून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खऱ्याखुऱ्या संसदेसारखे वाद-विवाद आणि चर्चा या युवा संसदेत रंगल्या होत्या. लोकशाहीत वाद-विवाद तसेच चर्चेचे महत्त्व किती आहे, हे यानिमित्ताने अधोरेखीत झाल्याच्या भावना सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

चर्चगेट परिसरातील एसएनडीटी कला व एस. सी. बी. विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय युवा संसद आयोजित करण्यात आली होती. रोटरी क्लबच्या नर्गिस गौर, पत्रकार विनया देशपांडे यांनी युवा संसदेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य जास्वंदी वांबुरकर, राज्य शास्त्र विभागाच्या प्रमुख चित्रा लेले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

युवा संसदेत प्रश्नोत्तरे तसेच अनेक महत्त्वाच्या विधेयकावर व्यापक चर्चा झाली. पंतप्रधान, गृहमंत्री, सभापती, विरोधी पक्षनेते आणि मंत्रिमंडळाची भूमिका विद्यार्थिनींनी पार पाडली. दिवंगत फातिमा बीबी, शरद यादव प्रकाश सिंग बादल यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना श्रद्धांजली वाहून संसद अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले.

या विषयावर चर्चा

अभिरूप संसदेत प्रश्नोत्तरांचा तास, शून्य प्रहर झाला. संसदेत प्रामुख्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तयारी, जी-२० भारताचे अध्यक्षपद, ग्लोबल साऊथ, चंद्रयान, पीपल प्रेसिडेन्सीचे महत्त्व यावर प्रामुख्याने चर्चा झाली. महिला आरक्षणामुळे देशात सामाजिक तसेच राजकीय बदलावरची चर्चा चांगलीच रंगली होती.

युवा संसदेमुळे संसदीय प्रक्रियांची माहिती विद्यार्थिनी आणि प्रेक्षकांना मिळाली. संसदीय लोकशाहीत विविध आयुधांचा वापर किती खुबीने करता येतो याचा अनुभवही विद्यार्थिनींना मिळाला.

- जास्वंदी वांबुरकर, प्राचार्य, एसएनडीटी

पंतप्रधान म्हणून भूमिका पार पाडताना सभागृहाच्या गदारोळातही नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व उत्तमरीत्या समजून घेता आलं. लोकशाहीमध्ये चर्चा-वादविवादांचे महत्त्व कळाले.

- प्रज्ञा नटे, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com