...तर CBI च्या पथकाला क्वारंटाईन व्हावे लागेल; BMC ने स्पष्ट केली भूमिका

समीर सुर्वे
Wednesday, 19 August 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआयचे पथक मुंबईत विना परवानगी आल्यास त्यांनाही होमक्वारंटाईन व्हावे लागेल असे महापालिकेडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआयचे पथक मुंबईत विना परवानगी आल्यास त्यांनाही होमक्वारंटाईन व्हावे लागेल असे महापालिकेडून स्पष्ट करण्यात आले आहे.

BIG NEWS - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? अनिल देशमुख म्हणालेत..

परराज्यातून मुंबईत विमानाने येणाऱ्यांना प्रवाशांना 14 दिवस सक्तीने होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.जर,सरकारी अधिकाऱ्यांना कामाच्या निमीत्ताने मुंबईत यायचे असल्यास त्यांना महापालिकेकडून पुर्व परवानगी घेणे बंधनकार आहे.सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत दिल्ली वरुन विशेष पथक येण्याची शक्‍यता आहे.

निकाल तर ऐतिहासिक; मात्र त्याचा राजकीय वापर नको, वाचा निकालावर वकीलांची प्रतिक्रिया

हे पथक जर 7 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी मुंबईत येणार असल्यास त्यांना होम क्वारंटाईन होण्याची गरज भासणार नाही.मात्र,ते 7 दिसवांपेक्षा जास्त कालावधीसाठी मुंबईत राहाणार असल्यास त्यांना होम क्वारंटाईन मधून सुट मिळवण्यासाठी पालिकेकडे ईमेल व्दारे अर्ज करावा असे पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी सांगितले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: so the CBI team has to be quarantined; BMC clarified the role