
मुंबई - कोरोना महामारीमूळे गेल्या 11 महिन्यात आतापर्यंत राज्यभरात 3951 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 103 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत 3537 कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले असून, अद्याप 311 कर्मचाऱ्यांचा उपचार सुरू असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात महामंडळाने मुंबईतील बेस्ट उपक्रमासह मुंबईतील अत्यावश्यक सेवा देण्याऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बोलविण्यात आले होते. दरम्यान अत्यावश्यक सेवेचे कर्तव्य बजावतांना एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली. विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाधीत कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
यामध्ये सर्वात जास्त ठाणे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर नांदेड उस्मानाबाद येथील कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त कोरोनाची लागन झाली होती. दरम्यान आतापर्यंत ठाणे विभागातील 11 एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असे एकूण राज्यात 103 कर्मचाऱ्यांचा मृत्युची नोंद महामंडळाने केली आहे.
एकाच दिवशी राज्यभरात 26 कर्मचारी बाधीत
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची अद्यापही कोरोना चाचणी सुरूच आहे. त्यापैकी 6 जानेवारी रोजी केलेल्या तपासणीत एकाच दिवशी राज्यभरात 26 एसटी कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहे. त्यामध्ये 11 कर्मचारी एकट्या परभणीचे असून 5 धुळे, 4 जळगांव, 3 सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे प्रत्येकी एक यांचा समावेश आहे.
So far 3951 employees of ST Corporation have been affected by Corona 103 employee deaths
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.