हॅलो... पोलिस स्टेशन! १०० नंबरवर ५८ हजार कोरोनाविषयी कॉल

हॅलो... पोलिस स्टेशन! १०० नंबरवर ५८ हजार कोरोनाविषयी कॉल

मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर ५८ हजार कोरोनाविषयी दूरध्वनी आले आहेत. राज्यभरातील पोलिस नियंत्रण कक्षांना हे दूरध्वनी आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती असून, अनेक लोक दुकानांबाहेर गर्दी करत आहेत. सामान खरेदी करत आहेत. सरकारने वारंवार सूचना केल्या तरीही नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी सध्या कोरोनाविषयी चौकशीसाठी खणाणत आहेत. २२ मार्चपासून १०० क्रमांकावर ५८ हजार ९ दूरध्वनी हे केवळ कोरोनाविषयी चौकशीसाठी आले होते.

याशिवाय जीवनावश्यक वस्तूंखेरीज उघड्या दुकानांबाबतही आले. तसेच आमच्या इमारतीत परदेशातून आलेले व्यक्ती राहत आहेत. कोरोना संशयित रस्त्यावर फिरत असल्याचे दूरध्वनीही पोलिसांना प्राप्त झाले. मला कोरोनाची चाचणी करायची आहे. होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, तरीही तो फिरत आहेत. कोरोनाची चाचणी कुठे करता येईल, अशा आशयाचे हे दूरध्वनी आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ अंतर्गत २७ हजार ४३२ गुन्हे दाखल आहेत. विलगीकरण केल्यानंतरही नियम तोडणा-या ४३८ व्यक्तींवर कारवाई केली आहे. बेकायदा प्रवास केल्याप्रकरणी ९८७ गुन्हे दाखल आहेत. राज्यभरात १२ हजार गाड्या जप्त केल्या असून, ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

So far 58,000 corona calls have been received to the police.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com