esakal | म्हणून जितेंद्र आव्हाड भयंकर संतापले, केलं ट्विट...
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून जितेंद्र आव्हाड भयंकर संतापले, केलं ट्विट...

कोरोना रुग्णांची संख्या सांगत असताना त्याचबरोबर आजारावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. याबाबत कोणीही भाष्य करत नसल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भयंकर संतापलेत. 

म्हणून जितेंद्र आव्हाड भयंकर संतापले, केलं ट्विट...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. राज्यातही रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याने माध्यमांनी या बातम्यांसह विरोधकांनी ही आकडेवारी सांगण्यास सुरुवात केली. मात्र कोरोना रुग्णांची संख्या सांगत असताना त्याचबरोबर आजारावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. याबाबत कोणीही भाष्य करत नसल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भयंकर संतापलेत. 

आता इन्फ्रारेड कॅमेरा तुमच्या शरिराच्या तापमानावर लक्ष ठेवणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर
 

महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा 1 लाखाचा आकडा आवर्जून सांगितला जातो. पण त्यातील 50 हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळलं जातं. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 जूनपर्यंत 1 लाख 7 हजार 58 इतकी झाली. रविवारी दिवसभरात राज्यात 3 हजार 390 रुग्ण आढळून आले.  

आव्हाडांनी याबाबत ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा 1 लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील 50 हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47.3 टक्के इतके आहे. तर मृत्यूदर 3.65 इतका आहे. राज्यात सध्या 5, 87, 596 लोक होमक्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात 1535 संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये 77,189 खाटा उपलब्ध असून सध्या 29,641 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काल दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून कोरोनामुक्त झालेल्या 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 53 हजार 17 इतकी आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.

loading image
go to top