तर मग देशात घोषित आणिबाणी आहे का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना सवाल

तुषार सोनवणे
Sunday, 13 December 2020

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार पासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार पासून मुंबईत सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाची रुपरेखा सांगितली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंघेला राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिवाळी अधिवेशनामध्ये सहा अध्यादेश पटलावर ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच पुरवणी मागण्या आणि विनियोजन बील मंजूर करण्यात येणार आहेत. सोमवारी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या दोन दिवसीय अधिवेशनाची रुपरेखा असणार आहे.

आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे महिला प्रवाशाचा जीव वाचला; मुंब्रा स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद

विरोधकांचं मागील वर्ष सरकार पाडण्याचं मुहूर्त पाडण्यात गेले. राज्यात जर अघोषित आणिबाणी असेल तर, केंद्रात-देशात घोषित आणिबाणी आहे का? विरोधी या शब्दाला भाजपला जागावे लागेल त्यामुळे त्यांच्या टीका या त्यांच्या जागी असू देत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

So is there a state of emergency in the country? Uddhav Thackerays question to Fadnavis

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So is there a state of emergency in the country? Uddhav Thackerays question to Fadnavis