मुलींना फसवणारा स्वत:च्याच जाळ्यात अडकला; पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींना फसवणारा स्वत:च्याच जाळ्यात अडकला; पोलिसांनी केली अटक

मुलींना फसवणारा स्वत:च्याच जाळ्यात अडकला; पोलिसांनी केली अटक

  • लग्नाचं आमिष दाखवून ठेवायचा शारिरीक संबंध; उकळत होता पैसे

मुंबई: हल्ली डिजिटल जग आणि सोशल मिडीया यांचा वापर खूपच वाढलाय. या सोशल मिडीयावर अनेक गैरप्रकारही (Social Media Fraud) घडल्याचे आपण नेहमी ऐकतो. नुकतीच मुंबईत (Mumbai) सोशल मिडियावरून मुलींना फसवणाऱ्या एकाला अटक (Arrest) करण्यात आली. राजवीर सिंग (Rajveer Singh) उर्फ पुखराज गोदाराम देवासी (Pukhraj Devasi) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा (Rajasthan) असून मुलींना लग्नाचे आमिष दाखवणे आणि लुटणे (Blackmailing) हाच त्याचा धंदा होता. जुहू पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. (Social Media Fraud who was blackmailing girls after sexual relation arrested by juhu police)

मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर सिंग उर्फ पुखराज गोदाराम देवासी हा मूळचा राजस्थानचा आहे. तो सुरूवातीला सोशल मीडिया अँपच्या माध्यमातून विविध मुलींशी जवळीक साधत असे. त्यानंतर मुलीशी ओळख झाली की तो त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचा आणि त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवायचा. मुलीकडून लग्नाची मागणी झाली की या शारिरीक संबंधांबद्दल धमकी देऊन तो मुलींकडून पैसे उकळत असे.

एका पिडीत मुलीने याबद्दल जुहू पोलिसांकडे तक्रार केली. आरोपीने पीडित मुलीकडून 35 लाख उकळले होते. या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर त्याने या मुलीकडून पैसे उकळले आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर तो राजस्थानला पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 'हनीट्रॅप' लावला. पोलिसांच्या 'हनीट्रप'मध्ये अडकून आरोपी मुंबईत आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

(संपादन- विराज भागवत)