Video: 'सिलिंडर मॅन'ने तुकाराम मुंढेंचे का मानले आभार?

रातोरात स्टार बनला अंबरनाथचा 'सिलिंडर मॅन'
Sagar Jadhav
Sagar Jadhav

घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवणारा एक साधा तरुण रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. अंबरनाथचा राहणारा सागर जाधव Sagar Jadhav हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रेल्वे स्टेशन परिसरात सिलिंडरच्या गाडीजवळ उभा असताना तुषार भामरे यांनी त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून त्याचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. हे फोटो सोशल मीडियावरील विविध ग्रुप्समध्ये तुफान व्हायरल झाले आणि या 'सिलिंडर मॅन'ची cylinder man चर्चा सुरू झाली. ३० किलोचा सिलिंडर उचलायचा असेल तर मग आपण ४५ किलोचे असून कसे चालणार, असा विचार करणाऱ्या सागरने गेल्या दोन-तीन वर्षांत मेहनत आणि जिद्दीने ही पिळदार शरीरयष्टी कमावली आहे. (social media sensation cylinder man thanked tukaram mundhe watch his special interview)

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंपासून ते 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेपर्यंत अनेकांनी त्याला कौतुकाची थाप दिली आहे. भविष्यात वेब सीरिज अथवा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर नक्की ती स्वीकारेन, असं सागर आनंदाने सांगतो.

पहा 'सिलिंडर मॅन'ची खास मुलाखत-

सागर हा अंबरनाथमधील लक्ष्मीनगर परिसरात पत्नी, भाऊ आणि काका-काकूंसोबत राहतो. याच परिसरात असलेल्या गॅसच्या गोडाऊनमध्ये तो काम करतो. एका साधारण गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्याला आता 'सिलिंडर मॅन' म्हणून हाक मारताना ऐकून खूपच आनंद होतो, असं तो म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com