रायगडच्या झेडपी इमारतींना सौर ऊर्जेचा संजीवनी; अखंड वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न 

महेंद्र दुसार
Sunday, 27 December 2020

रायगड जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींवर ठिकाणी सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अलिबाग: जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्यामुळे सरकारी कार्यालयातील कामाचा खोळंबा होतो. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. किरण पाटील यांनी यासाठी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण विभागाकडे पत्र दिले आहे. यामध्ये त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याची विनंती केली आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सुमारे 8 हजार इमारती आहेत. यामध्ये एक जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारती, 15 पंचायत समित्या, 17 एकात्मिक बाल विकास प्रकल्प, तीन हजार 234 अंगणवाड्या, तीन हजार 206 प्राथमिक शाळा, 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 288 उपकेंद्र, 810 ग्रामपंचायती, 100 पशुवैद्यकीय दवाखाने यासह इतर इमारतींचा समावेश आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयातील वीज पुरवठा अनेक कारणांमुळे वारंवार खंडीत होतो. यामुळे कामे खोळंबतात. या बाबत डॉ. पाटील यांनी विचार करून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इमारतींचे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत सर्वेक्षण करून इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली आहे. 

 

जिल्हा परिषदेच्या ताब्यातील इमारतींचा वीज पुरवठा सतत वीज खंडीत होतो. त्यामुळे अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा ग्रामीण भागातील यंत्रणावर काम करताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा देताना अडथळे निर्माण होतात. परंतु सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वीत केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा तातडीने देता येणार आहे. 

-डॉ. किरण पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद 

Solar energy revitalization of ZP buildings of raigad Efforts to ensure uninterrupted power supply

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar energy revitalization of ZP buildings of raigad Efforts to ensure uninterrupted power supply