रुग्णवाहिकेसाठी चालकांची कमतरता, 'या' चालकांनी घेतला पुढाकार...

रुग्णवाहिकेसाठी चालकांची कमतरता, 'या' चालकांनी घेतला पुढाकार...
Updated on

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत या व्हायरसचा  सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पालिकेनं रुग्णवाहिका वाढवल्या. ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतात त्या त्या ठिकाणी रुग्णवाहिका जाताहेत. पण या रुग्णवाहिकांसाठी पालिकेसमोर चालक मिळत नसल्याची समस्या उद्भवली आहे. त्यामुळं यावर उपाय म्हणून महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा गाड्यांवरील चालकांना रुग्णवाहिकांसाठी नेमण्यात आलं आहे. 

महापालिका प्रशासनानं बेस्ट बस आणि खासगी वाहनांचा वापर रुग्णवाहिका म्हणून सुरू केला आहे. अशा विविध प्रकारच्या 400 हून अधिक रुग्णवाहिका सध्या पालिकेकडे आहेत. मात्र या रुग्णवाहिकेवर पुरेसे चालक नसल्यानं पालिकेनं घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरील चालक नेमले. अंधेरीतल्या के-पूर्व विभागातल्या चालकांची नेमणूक केल्याचं आढळून आलं आहे. पुरेसे चालक नसल्याने मुख्य गॅरेजमधून 8 पैकी फक्त 2 किंवा 3 डम्पर येत असल्याची देण्यात आली. दरम्यान अंधेरी, जोगेश्वरी परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आनंद वाघराळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आहे.

यानंतर के-पूर्व विभागात अंधेरी, जोगेश्वरी परिसरातील काही भागात कचऱ्याचे ढीग पडून राहत असल्याचं या भागातील नगरसेवक अभिजीत सामंत यांना आढळून आले. कचरा रोज उचलला न गेल्यास मुंबईत पावसाळी रोगांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे काही महिन्यांकरिता रुग्णवाहिका अथवा कचऱ्याची वाहनं चालवण्याकरिता कंत्राटी चालक नेमावेत, अशी मागणी सामंत यांनी पालिकेकडे केली आहे.

to solve crisis of ambulance drivers now drivers from cleaning team will drive ambulances

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com