सुशांत राजपूतच्या जवळच्या मैत्रिणीला बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी... 

Riya
Riya

मुंबई : चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर आता त्याची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. रिया चक्रवर्ती यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन इस्टाग्राम अकाउंटवरून काही लोक अश्लील संदेश पाठवत असून त्यांना इन्स्टाग्रामवर धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  

रिया चक्रवर्ती यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. रिया चक्रवर्ती यांच्या तक्रारीच्या आधारे सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये दोघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियावर या लोकांविरूद्ध अश्लील संदेश आणि धमक्या पाठविल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती परिमंडळ ९ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे  यांनी दिली.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनापासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर राहिल्या आहेत, सुशांतचे चाहते तिच्या वर नको नकोत्या भाषेत टिका करून तिला निरर्थक, स्वार्थी आणि हुशार असल्याचे हिनवत आहेत. मात्र सुशांतच्या एका चाहत्याने सीमा ओलांडून चक्क असे काही पोस्ट केले. ती पोस्ट वाचून रियाच्या पायाखालची जमिनच सरकली. सोशल मीडियावर एका माथेफिरूने तर चक्क रियाला बलात्कार आणि हत्येची धमकी दिली होती, त्यानंतर रियाने संयम सोडला.
 
रियाने धमकी देणाऱ्या त्या माथेफिरूने सोशल मिडियावर दिलेल्या त्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिले की, “मला ‘गोल्ड डिगर’ म्हटले होते .. मी गप्प बसले. मला मर्डर म्हणतात ... मी गप्प बसले. मला शिव्या दिल्या ... मी गप्प बसले. पण जर मी आत्महत्या केली नाही, तर मग मी बलात्कार करून खून होईल” अशी धमकी कुणी कुणाला कसे काय देऊ शकतात. या गोष्टीच्या गांभीर्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का?  हे कल्पनेच्या बाहेर आहे, हा गुन्हा आहे, कोणीही अशा प्रकारचा त्रास देणे आणि चुकीची माहिती पसरवू शकत नाही, मी सायबर क्राईमला या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन करते, आता अती होत आहे. असे ट्विट रियाने काही दिवसांपूर्वी केले होते.

काही दिवसांपूर्वी रियाने गृहमंत्री अमित शहा यांना ट्विट करुन सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. ज्यात तिने लिहिले आहे की, आदरणीय अमित शाह सर, मी सुशांतसिंग राजपूतची  मैत्रिण रिया चक्रवर्ती आहे, त्याच्या अकस्मात मृत्यूला आता महिनाभरापेक्षा अधिक काळ झाला आहे, न्यायाच्या शोधात, मी तुम्हाला विनवणी करते की, या प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू करा. मात्र याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांता तपास योग्य पद्धतीने सुरू असून सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com