लसींच्या ग्लोबल टेंडरच्या मागे गौडबंगाल - प्रसाद लाड

आज जगामध्ये भारताच्या लसींना मागणी
लसींच्या ग्लोबल टेंडरच्या मागे गौडबंगाल - प्रसाद लाड

मुंबई: कोविड लसींचे एक कोटी डोस विकत घेण्यासाठी महानगर पालिकेने (bmc) जागतिक निविदा (global tender) जाहीर केल्या आहेत. त्यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. ग्लोबल टेंडरच्या मागे काय गौडबंगाल आहे, याचा विचार केला पाहिजे, असे प्रसाद लाड (prasad lad) यांनी म्हटले आहे. (Something suspicious behind global tender for vaccine prasad lad slam bmc)

"जगात आजही भारतात बनणाऱ्या कोव्हॅक्सिनआणि कोव्हीशिल्ड या दोन लसींना मागणी आहे. मग असं असताना, तुम्ही ग्लोबल टेंडरच्या मागे का धावता?" असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. "रशियाच्या स्पुटनिक लसीलाही केंद्राने परवानगी दिली आहे. ती लस भारतातच आहे. लोकांना दाखवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी ग्लोबर टेंडरच्या नावाखाली जो बागुलबुवा उभा करताय, तो अतिशय निषेधार्ह आहे" असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

लसींच्या ग्लोबल टेंडरच्या मागे गौडबंगाल - प्रसाद लाड
सरकारकडे अनलॉकचा एक्झिट प्लान आहे का? - मनसे

"देशातील जे लस उत्पादक, वितरक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन काम केले, तर मुंबई, महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल" असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com