ST च्या कर्तव्यावरच वडिलानंतर मुलाचाही मृत्यू, सानप कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर

ST च्या कर्तव्यावरच वडिलानंतर मुलाचाही मृत्यू, सानप कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर

मुंबईः  एसटीत चालक पदावर कार्यरत रामदास सानप यांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचा मुलगा अरूण वाहक म्हणून एसटीत रुजू झाला. नुकतेच पाच महिन्यापूर्वी अरूणचे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न बघणे सुरू असतानाच अचानक कोरोनाच्या माहामारीत मुंबईत कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन 24 वर्षीय अरूणला सुद्धा आपला जीव गमवावा लागला.

कोरोनाच्या महामारीत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. उपासमार, बेरोजगारी आली. मात्र, सानप कुटूंबियांनी एसटी महामंडळात कर्तव्यावर दोन जीव गमावले आहे. अरूणचे वडिल रामदास सानप नाशिक डेपोत चालक पदावर कर्तव्यावर होते. 2015 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर दोन वर्षानंतर अरूण अनुकंप तत्वावर एसटीत रुजू झाला होता. अरूण नोकरीवर लागल्याने सानप कुटूंबियांवरील आर्थिक अडचणी दूर झाल्या. दरम्यान याचवर्षी 12 मे रोजी अरूणचा विवाह सुद्धा झाला. आता कुठेतरी सानप कुटूंबामध्ये सुख नांदत असताना, मुंबईतील कर्तव्यावर अरूणला कोरोनाची बाधा होऊन 3 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

रामदास यांच्या मृत्यूनंतर अरूण नोकरीवर लागला होता. मात्र, अरूणच्या अकाली मृत्यूनंतर आता त्यांचा लहान भाऊ, आई आणि अरूणची पत्नी राहिल्या आहे. त्यातही उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फक्त 45 गुंठे म्हणजे एक एकर सुद्धा जमीन नाही. त्यानंतरही अद्याप या कुटूंबाची अद्याप एसटी प्रशासनाने कोणतीही विचारपूस केली नसून कोणतीही मदत मिळाली नसल्याने सानप कुटूंबिय चिंतातूर झाले आहे.

भाऊ आमच्या घराचा कर्ता माणूस होता. वडीलानंतर त्यांच्यामुळेच आमचे घर चालत होते. मात्र, त्यांच्या जाण्याने आम्ही सगळे खचलो आहे. त्यांची लासलगांव डेपोमध्ये चांगली नोकरी सुरू होती. मात्र, मुंबईत कर्तव्यावर गेल्यानंतर कोरोनाची लागल झाल्यावर योग्य उपचार, त्यानंतर नाशिकमध्ये वेंटिलेटर न मिळाल्याने भाऊ गमवाला लागला आहे. मात्र, अद्याप एसटीची कुठलीही मदत नाही.
विकास सानप, मुतक अरूणचा भाऊ
 
लासलगांव डेपोतील कर्मचाऱ्यांचा बंड

कोरोनाने बाधित होऊन अरूणसह चालक भानुदास सोनवने यांचाही कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्यामुळे लासलगांव डेपोच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत कर्तव्यावर जाण्यास विरोध केला आहे. मुंबईतील असुविधा,आरोग्याशी होणारी हेळसांड असे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच असताना, कर्तव्याला विरोध केल्याने, दबावतंत्राचा वापर करून तब्बल 9 वाहक आणि 9 चालकांना लासलगांव आगार व्यवस्थापकाने निलंबित केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा घडला आहे.

 कर्मचारी संघटना पांढरा हत्ती

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध पक्षाच्या तब्बल 22 एसटी कर्मचारी संघंटना आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर एकही एसटी कर्मचारी संघटना ठोस भूमीका घेत नसल्याने, कर्मचारी संघंटना फक्त नावापुरत्या असल्याची टीका सुद्धा कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Son dies after father on ST duty grief Sanap family

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com