esakal | आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलाने सोडले घर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कासारवडवली पोलिसात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल

आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलाने सोडले घर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : स्वयंपाक करण्यावरून झालेल्या आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून मुलाने घर सोडल्याची घटना कासारवडवली येथे घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

कासारवडवली, हावरे सिटीच्या मागे राहणारे बाबुराव कसबे (41, मूळ रा. नांदेड) हे ठाण्यात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. दोन मुले नांदेड येथे असतात, तर राहुल (16) हा त्यांच्यासोबत ठाण्यात राहतो. कसबे यांची पत्नीदेखील घरकाम करते. गुरुवारी रात्री पती-पत्नीमध्ये स्वयंपाक करण्यावरून क्षुल्लक भांडण झाले.

नेहमीच्या या भांडणाला कंटाळून त्यांचा मुलगा राहुल हा घरातून निघून गेला. वडिलांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र, तो सापडला नसल्याने कासारवडवली पोलिसात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

loading image
go to top