पोलिसांमुळे तब्बल सहा महिन्यांनी माय लेकाची भेट! 

अभय आपटे
Sunday, 9 August 2020

तब्बल सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेली वृद्ध महिला मांडला पोलिस आणि दामिनी पथकामुळे आपल्या मुलाला भेटली आहे. आपली आई परत मिळाल्याने मुलाच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

रेवदंडा ः तब्बल सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेली वृद्ध महिला मांडला पोलिस आणि दामिनी पथकामुळे आपल्या मुलाला भेटली आहे. आपली आई परत मिळाल्याने मुलाच्या आनंदाला पारावार उरला नाही. 
एसटीतील चालक महिलांच्या प्रशिक्षणाला ब्रेक; 236 महिला कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात 

 मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील मांडला पोलिस ठाणे हद्दीत एक अनोळखी ५० वर्षीय महिला फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी तसेच दामिनी महिला पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी त्या महिलेला रेवदंडा पोलिस ठाण्यात आणले. चौकशीमध्ये ती महिला वाकीपाडा-वसईमधील असून तिचे नाव प्रतिमा घाग असल्याचे समजले.

अशी मिळणार रायगडकरांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवा

याप्रकरणी रेवदंडामधील पोलिसांनी पालघर पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाला संपर्क साधला असता वाळीव पोलिस ठाण्यात संपर्क करायला सांगितले. त्या पोलिस ठाण्यात ही महिला 20 फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या मुलांनी केल्याचे समोर आले. त्यामुळे तात्काळ या मुलाला रेवदंडा पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्या आईचा ताबा देण्यात आला. ही महिला मनोगरुग्ण असून कोणाला काहीच न सांगता फेब्रुवारी महिन्यात घरातून निघून गेली होती, अशी माहिती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली. 

मुंबई, वसई

son meet his mother by help of police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son meet his mother by help of police