esakal | सामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा?
sakal

बोलून बातमी शोधा

सामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा?

अभिनेता सोनू सुद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

सामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचं संकट भारतात धडकलं आणि कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मुंबईत राहणाऱ्या इतर राज्यातल्या मजुरांचा रोजगार गेला. एकीकडे कोरोनापासून आपला जीव वाचवायचा आणि दुसरीकडे पोटाची खळगी कशी भरायची हा परप्रांतीय मजुरांसमोर प्रश्न निर्माण झाला. अशातच सुरु झाली त्या सर्वांची स्वतःच्या गावी जाण्याची धडपड. ही मंडळी थेट चालत निघाली आपापल्या गावी, कुणी उत्तर प्रदेश, कुणी बिहार कुणी कुठे..   

त्यांची ही धडपड पाहून बॉलिवूड स्टार सोनू सूद त्यांच्या मदतीसाठी धावून आला. त्यानं या मजुरांची गावी जाण्याची सोय केली. मात्र आजच्या सामानाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका केली. त्यांच्या या टीकेवर राजकीय वातावरणही बरंच तापलं. दरम्यान अभिनेता सोनू सुद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा: मेट्रो 3 भुयारी मार्गिकेवर कृत्रिम पडद्याचा वापर; पावसाळ्यातही भुयारीकरणाचं काम राहणार सुरू

शिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या साप्ताहिक सदरात सोनू सूद करत असलेल्या कामाबद्दल शंका व्यक्त करत हा शिवसेना आणि सरकारला  बदनाम करण्याचा डाव असल्याचे नमुद केले होते. सोनू सुदच्याा या कार्यामागे भाजपची मदत असल्याची शंकाही या लेखात व्यक्त करण्यात आली होती.

सूद याने हजारो  स्थालांतरीत कामगारांना स्वखर्चाने त्यांच्या घरा पर्यंत जाण्याची सोय करुन दिली. तसेच काही अडकलेल्या नागरीकांसाठी  विमानेही त्यांच्या घरी जाण्याची सोय केली. त्याच्या या कामाचे कौतूक होत असताना काही दिवसांपुर्वी त्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही त्याच्या कामाचे कौतूक केले.

हेही वाचा: दिलासादायक बातमी! धारावीत कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात; दादर-माहीममध्येही रुग्णवाढ आटोक्यात..

संजय राऊत यांच्या आजच्या लेखावरुन भाजपसह मनसेनेही शिवसेनेवर टिका केली आहे.तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सोनू सुदच्याा कामाचे कौतूक केले. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा सोनू सुद याने उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याची शक्यता आहे. 

sonu sood going for meeting with cm udhhav thackeray