मुंबईतील कोरोना नियंत्रणात परंतु; 'या' प्रभागाने पुन्हा वाढवली चिंता...

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 19 July 2020

:कुलाबा ए प्रभागात कोविड संक्रमणाचा आलेख आजही चढताच आहे. या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शुक्रवारी 43 दिवसांवरुन शनिवारी 42 दिवसांवर आला आहे.

मुंबई ::कुलाबा ए प्रभागात कोविड संक्रमणाचा आलेख आजही चढताच आहे. या भागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शुक्रवारी 43 दिवसांवरुन शनिवारी 42 दिवसांवर आला आहे. तर,आर उत्तर दहिसर मध्य 43 दिवसांवरुन 40 दिवसांपर्यंत खाली आहे. मुंबईतील सर्वात सुरक्षीत प्रभाग असलेल्या एच पुर्व वांद्रे पुर्व प्रभागातही रुग्ण दुप्पट होण्यचा कालावधी 153 दिवसांवरुन 146 दिवसांवर आला आहे.मात्र,या प्रभागातील रुग्णवाढीचा दर 0.5 टक्‍क्‍यांवर कायम आहे.

राममंदिर भूमी पूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमंत्रण येईल का? शिवसेना खासदारने दिले 'हे' उत्तर; वाचा

मुंबईतील जवळ जवळ सर्वच प्रभागातील कोविड संक्रमण स्थिर अथवा घटत आहे. मात्र, ए प्रभागात गेल्या आठवड्या भरात संक्रमण वाढू लागले आहे. मुंबईतील निवडक सुरक्षीत प्रभागात ए प्रभागाचा समावेश होता. शुक्रवारी या कुलाबा,मरिनलाईन्स,फोर्ट परीसरात कोविड रुग्णवाढीचा दर 1.6 टक्के होता.तो शनिवारी 1.7 टक्के झाला.तर,दहिसर मध्येही रुग्णवाढीचा दर 1.6 टक्‍क्‍यांवरुन 1.7 टक्‍क्‍यांवर होता.मात्र,गेल्या आठवड्या पर्यंत दहिसर मधिल रुग्णवाढीचा दर 2 टक्‍क्‍यां पेक्षा अधिक होता.

 

कुुलाबा येथे शनिवार पर्यंत 2276 रुग्णांची नोंद झाली आहे.तर,आर उत्तर प्रभागात 2421 रुग्णांची नोंद झाली आहे.शहरातील सर्वात कमी रुग्णवाढीचा दर 0.5 टक्के एच पुर्व वांद्रे,खार,सांताक्रुझ पुर्व भागात आहे.मात्र,या प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 153 दिवसांवरुन 146 दिवसांवर आली आहे.तर,मुंबईतील 1.26 टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 54 दिवसांवरुन 55 दिवसांवर आला आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज विक्रमी रुग्णांची नोंद... वाचा आकडेवारी सविस्तर

बोरीवलीत 120 रुग्ण वाढले
बोरीवली आर मध्य प्रभागात एका दिवसात 120 नव्या रुग्णांची नोंद झाली असून शनिवार पर्यंत येथे 4426 रुग्ण आढळले आहेत.तर,ग्रन्टरोड,मलबार हिल डी प्रभागात 3589 रुग्ण नोंदविण्यात आले असून एका दिवसात 56 रुग्ण आढळले आहे.कांदिवली आर दक्षिण मध्य 98 रुग्ण एका दिवसात आढळले असून तेथे शनिवार पर्यंत 4246 रुग्णांची नोंद झाली आहे.मुलूंड टी प्रभागात 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्या 4095 वर पोहचली आहे.तर,दहिसर मध्ये 48 आणि ए प्रभागात 30 नवे रुग्ण आढळले आहेत.
 

ए प्रभागातील कुलाबा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे 90 रुग्णांची नोंद झाली असू गणेशमुर्ती नगर येथे 77 आणि कुलाबा कॉजवे मच्छिमार नगर मध्ये 70 रुग्णांची नोंद झाली आहे.तर,मरिन ड्राईव्ह येथील लक्ष्मी भवन या एका इमारतीत 29 रुग्ण आढळले आहेत.दहिसर मध्ये अशोक वन जवळील टोपिवला चाळीच्या परीसरात 97,घरातन पाडा परीसरात 76 रुग्ण नोंदविण्यात आले आहे.तर,दहिसर पश्‍चिमेकडील साई कृपा चाळीच्या परीसरात 64 रुग्णांची नोंद झाली आहे.
----------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as covid's graph rises in Colaba Increased infection in Dahisar too