अनलॉकनंतर गोंगाट वाढला, मुंबईतील ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढलं; आवाज फाउंडेशनचा अहवाल

अनलॉकनंतर गोंगाट वाढला, मुंबईतील ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढलं; आवाज फाउंडेशनचा अहवाल

मुंबई, ता. 30 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील ट्रॅफिकमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र, आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर गाड्याही मोठ्या संख्येने धावू लागल्या आहेत. ज्यामुळे नियंत्रणात आलेल्या ध्वनी प्रदूषणाचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे.

आवाज फाउंडेशनने नोंदवलेल्या अहवालानुसार, लॉकडाऊनमध्ये म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात रस्त्यावरील ट्रॅफिक आणि इतर गोष्टींमुळे होणाऱ्या आवाजात घट नोंद करण्यात आली आहे. मात्र, अनलॉक केल्यानंतरच्या पुढच्या सर्व महिन्यात पुन्हा एकदा ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

2020 च्या महामारीच्या कालावधीत आवाज फाउंडेशनने वांद्रे, एसव्ही रोड, दादर आणि मोहम्मद अली रोड या ठिकाणांसह रहिवासी आणि व्यावसायिक भागातील ध्वनी पातळी मोजली. त्यात लॉकडाऊन पूर्वी ट्रॅफिकच्या आवाजासह इतर आवाजाची पातळी जवळपास 65 डीबी - 105 डीबीपर्यंत होती.  

कोरोना काळाता आवाजाची पातळी -

  • लॉकडाउन 1: मार्च / एप्रिल 2020 डेसिबलची पातळी 41.7 ते 66 डीबी
  • लॉकडाउन 2: एप्रिल / मे 2020, डेसिबलची पातळी 52.9 - 63.6 डीबी
  • लॉकडाउन 3 आणि 4: मे 2020 डेसिबलची पातळी 52 - 56.4 डीबी
  • अनलॉक 1.0: मे / जून 2020, डेसिबलची पातळी 52.9 - 89.8 डीबी होती
  • अनलॉक 2.0: जुलै 2020, डेसिबलची पातळी 58.0 डीबी - 89.5 डीबी
  • अनलॉक 3.0: ऑगस्ट 2020, डेसिबलची पातळी 60.3 ते 81.8 डीबी
  • अनलॉक 4.0: सप्टेंबर 2020, 64.0 डीबी ते 90.5 डीबी
  • अनलॉक 5.0: ऑक्टोबर 2020, 64.2 डीबी - 94.8 डीबी
  • अनलॉक 6.0: नोव्हेंबर 2020. 66.1 डीबी ते 92 डीबी
  • अनलॉक 7.0 : डिसेंबर 2020 64.6 डीबी ते 95.6 डीबी

मुंबईतील ध्वनी प्रदूषणासंदर्भात 2018 मध्ये झालेल्या नीरी अहवालात वाहतुकीतून निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण हेच ध्वनी प्रदूषणाचा प्रमुख स्त्रोत आहे. मार्च 2020 मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यानंतर लगेचच, जेव्हा वाहनांची रहदारी जवळपास पूर्णपणे थांबली होती तेव्हा, आवाजाची पातळी कमी होऊन 41.7 डीबी आणि 66 डीबी दरम्यान होती. रहदारी वाढल्यानंतर आवाजाची पातळीही हळूहळू वाढू लागली. डिसेंबर 2020 मध्ये वर्षाच्या शेवटी ही पातळी ते 64.6 डीबी ते 95.6 डीबी दरम्यान आहे. दरम्यान, ही पातळी लॉकडाउनपूर्वीपेक्षा अद्याप कमी असून 65 डीबी ते 105 डीबीपर्यंत आहे. परंतु, लॉकडाउननंतरच्या पहिल्या टप्प्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, असे आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलली यांनी सांगितले आहे.

sound pollution in mumbai increased after unlocking report by awaaz foundation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com