esakal | Mumba[: दक्षिण मुंबईतील 67 घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा

दक्षिण मुंबईतील 67 घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घरे उपलब्ध नसल्याने यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत निघाली नाही. परंतु आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई मंडळ सोडत काढण्याच्या विचारात आहे. या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाकडून (आर आर मंडळ) मिळालेल्या दक्षिण मुंबईतील 67 घरांचा समावेश होणार आहे. ही घरे आर आर मंडळाने मुंबई मंडळाला दिली असून सुमारे 750 ते 1200 चौरस फुटाची ही घरे मुंबईकरांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत.

सध्या म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 8 हजार 984 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कोकण मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची संगणकीय सोडत 14 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर मुंबई मंडळ सोडत काढणार आहे. या मुंबई मंडळाकडे यंदा घरे नसल्याने सोडत काढण्यात आली नाही. मात्र पुढील वर्षी पहाडी गोरेगाव येथील पहिल्या टप्प्यातील उपलब्ध होणाऱ्या घरांची सोडत काढण्याची मंडळाची तयारी सुरु आहे. गोरेगाव येथील ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.

हेही वाचा: खासगी तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीची : पश्चिम रेल्वे

याशिवाय विविध ठिकाणची विखुरलेली घरेही या सोडतीमध्ये असतील. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाकडून उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून मिळालेली अतिरिक्त घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी देण्यात येतात. त्यानुसार पुढील सोडतीसाठी सुमारे 67 घरे मुंबई मंडळाला देण्यात आली आहेत. सुमारे 750 ते 1200 चौरस फुट आकाराची ही घरे मध्यम ते उच्च उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. मात्र बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाची घरे कित्येक पटीने कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याने या घरांसाठी मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई मंडळाचा सोडतीसाठी घरे दिली आहेत. ही घरे 750 ते 1200 चौरस फुटाची आहेत.

- अरुण डोंगरे - मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

loading image
go to top