कृषी सुधारणा विधेयकावरून महाविकास आघाडीत ठिणगी; शिवसेना - राष्ट्रवादीच्या भूमिकेवर कॉंग्रेसचा आक्षेप

तुषार सोनवणे
Tuesday, 22 September 2020

याविधेकामुळे महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मुंबई - संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर देशात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसपक्षाने देशभर या आंदोलनाला विरोध केला आहे. राज्यातील सत्तेत कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे. परंतु शिवसेनेची ठोस भूमिका या विधेयकाबाबत अजूनतरी स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे, याविधेकामुळे महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बेस्ट बसही अधिक क्षमतेने सुरू होणार; मुंबईकरांना दिलासा मिळणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी सुधारणाविधेयकाला विरोध का केला नाही. राज्यसभेत कृषी सुधारणाविधेयक मंजूर झाले तेव्हा शरद पवार सदनात गैरहजर का होते. सभागृहात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विधेयकाल विरोध का नाही केला, याबाबत राज्यातील कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

राज्यातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांसमोर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली . कॉंग्रेसचा या विधेयकाला विरोध कायम आहे. हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकऱ्याला बड्या कंपन्यांच्या दावनीला बांधन्याचा हा डाव आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी या विधेयकाला विरोध करणं गरजेचं असल्याचं थोरात यांनी यावेळ स्पष्ट केलं. राज्यातील महाविकासआघाडीतील सहभागी पक्षांनी या विधेयकाला विरोध का नाही केला. यासंदर्भात कॉंग्रेसपक्ष मित्र पक्षांना विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचा सभागृहातील आकडा बहुमतात असल्याने त्यांनी हुकूमशाही पद्धतीने हे विधेयक रेटन्याचा प्रयत्न केला. अशी टीकाही थोरात यांनी केली.

रेल्वेचा प्रवास मनसे नेत्यांना भोवणार;  संदीप देशपांडेंसह तीन नेत्यांवर गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी अटक

दरम्यान, राज्यसभेत कामगाज सुरू असताना गोंधळ घालून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी, 8 खासदारांचे निलंबन सभापती व्यंकया नायडू यांनी केले होते. त्यामुळे या खासदारांनी संसदेच्या बाहेर आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ कालपासून या खासदारांनी ठिय्या मांडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spark in the Mahavikas Aghadi from the Agriculture Reforms Bill Shiv Sena Congresss objection