
मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान नवीन पाइपलाइन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी (ता. ५) मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान रात्री १.३० ते रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जतदरम्यानच्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे.