एस्‍सेलवर्ल्‍डतर्फे नीट परीक्षार्थ्यांसाठी विशेष बस सेवा; मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 12 September 2020

  उद्या (ता. 13) नीट परीक्षेसाठी मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्‍यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी एस्सेलवर्ल्डतर्फे दोन बसगाड्या सोडल्या जाणार आहे

मुंबई -  उद्या (ता. 13) नीट परीक्षेसाठी मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्‍यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी एस्सेलवर्ल्डतर्फे दोन बसगाड्या सोडल्या जाणार आहे. लॉकडाऊनमुळे लोकलसेवा बंद असल्याने नीट परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास करण्‍याचे आव्‍हान विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे एस्‍सेलवर्ल्‍डने भाईंदर स्थानक ते तपोवन विद्यालय आणि मिरा रोड स्थानक ते सेव्‍हन स्‍क्‍वेअर अकॅडमी पर्यंत सकाळी 10 वाजल्‍यापासून दोन बसगाड्या चालवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 5.30 वाजल्‍यापासून परतीच्या प्रवासासाठी संबंधित स्थानकांपर्यंत बसगाड्या चालवण्‍यात येणार आहेत.   

सोमय्यांच्या आरोपानंतर महापौरांनी सोडले मौन; म्हणाल्या आरोप सिद्ध करा शिक्षा भोगेन

'नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एस्‍सेलवर्ल्‍डच्यावतीने मदत करण्‍याची आमची जबाबदारी आहे. आमच्‍या बसगाड्या स्‍वच्‍छ व सॅनिटाईज करण्‍यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्‍यांना सुरक्षित वातावरणामध्‍ये प्रवास करण्‍याची खात्री मिळेल. आमच्‍याकडून नीट परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा.' 
- परेश मिश्रा,
वरिष्ठ उपाध्यक्ष, विक्री व विपणन, एस्सेलवर्ल्ड.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special bus service for examinees by EsselWorld