
युनायटेड किंगडममधून 25 नोव्हेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई, ता. 24 : युनायटेड किंगडममधून 25 नोव्हेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. या प्रवाशांनी त्यांच्या कौटूबिक डॉक्टर (फॅमेली फिजीशीयन ), महापालिकेचे आरोग्य केंद्र तसेच दवाखान्यात किंवा महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मनात शंका असल्यास कोविडची चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही महापालिकेने दिला आहे.
युनायटेड किंगडममध्ये कोविडचा नवा प्रकाराचा विषाणू आढळला आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या विमानसेवा बंद करण्यात आलाय आल्या आहेत. तसेच, मंगळवारी या देशातून आलेल्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, 25 नोव्हेंबरपासून भारतात आलेल्या प्रवाशांसाठीही नियमावली तयार करण्यात आली आहे. वैद्यकिय सल्ला घेणे, कोविड चाचणी करुन घेणे याचबरोबर मास्क वापरणे, नियमीत वैयक्तीक स्वच्छता राखणे, सुरक्षीत अंतर राखणे या नियमावलीचे पालन करावे असे आवहन पालिकेने केले.
महत्त्वाची बातमी : कोविड काळातील नुकसान भरून काढण्यासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे
कोविडसदृष्य ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास अथवा अन्य आजाराची लक्षणे असल्यास पालिकेच्या वॉररुमला संपर्क करावा असेही महापालिकेने नमुद केले.
महापालिका वॉर रुमचे क्रमांक ( प्रभाग - क्रमांक)
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
special code of conduct for people coming from UK note down ward wise important helpline numbers