स्पेशल क्षण, फोटो, लव नोट्स ! लॉकडाऊनच्या काळात डिजीटल प्रेमाला फुटले धुमारे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

देशात लॉकडाऊनच्या काळात डेटींग ऍप्सची लोकप्रियता वाढली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी बसावे लागले आहे. त्यामुळे या काळात डिजीटल प्रेमाला धुमारे फुटले असल्याचे चित्र आहे

मुंबई, ता. 2 : देशात लॉकडाऊनच्या काळात डेटींग ऍप्सची लोकप्रियता वाढली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी बसावे लागले आहे. त्यामुळे या काळात डिजीटल प्रेमाला धुमारे फुटले असल्याचे चित्र आहे. डेटिंग अँप्सद्वारे रोमान्स करणाऱ्यांची युवांची संख्येत वाढ झाली आहे. टिंडरसह अनेक डेटींग ऍप्स मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

याच वाढलेल्या प्रतिसादाचा फायदा घेत, टिंडर या डेटिंग ऍपने एप्रिल महिन्यात सर्व सदस्यांसाठी पेड पासपोर्ट हा एक नवा पर्याय उपलब्ध केला आहे. ज्यामुळे तूम्ही तुमच्या शहरातील किंवा भारतातील जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत लाईक, चॅट्स आणि गप्पा मारता येऊ शकतात. त्यांना त्यांच्या राहत्या स्थानामध्ये बदल करून, कोणत्याही शहर किंवा देशातील इतर वापरकर्त्यांसोबत गप्पा मारता येऊ शकतात. 

धक्कादायक ! उपचारांनंतरही फुफ्फुसांमध्ये लपून राहतो कोरोना? काय सांगतायत वैज्ञानिक?

आश्चर्याची बाब म्हणजे, बहुतेक भारतीय वापरकर्त्यांनी जगातील इतर शहरांपेक्षा भारतीय वापरकर्त्यांशीच बोलणे पसंद केले आहे. या ऍपमध्ये भारताच्या बहुतेक सदस्यांनी स्थान बदलण्याच्या वैशिष्टयात दिल्ली-मुंबई आणि मुंबई-दिल्ली या शहरांना एकमेकांना ‘पासपोर्टिंग’ चे प्राधान्य दिले आहे.

काय आहेत यामागची कारणे? 

सध्या भारतात कोरोना महामारी सुरु आहे. त्यामूळे, भारतातील युजर्स या परीस्थितीला चांगल्या पद्धतीने समजू शकतात. शिवाय, या लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर ज्यांच्याशी आपण बोलत आहोत त्यांना भेटता येऊ शकते. त्यामूळे, सर्वात मुंबई आणि दिल्लीचे प्रमाण जास्त आहे. 

लॉक डाऊनमुळे घरातली भांडणं, ताण तणाव वाढतोय ? जाणून घ्या कारणं...   

ही पाच शहरे अग्रेसर 

भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरू आणि कोलकाता ही पाच शहरे पासपोर्ट स्थान वैशिष्टयात अग्रेसर आहेत. त्यात ही बंगळूरू- दिल्ली, चेन्नई - बंगळूरू आणि पुणे- मुंबई इथले युजर्स एकमेकांच्या सर्वाधिक संपर्कात आले आहे.

टॉप ट्रेडिंग डेटिंग ऍप्स  

फेसबुक ट्युन, टिंडर, मॅडली, ओकेकुपीड, हँपन यासारखे अँप्स लोकप्रिय आहे. या ऍप्सवर चँटीग, स्पेशल क्षण, फोटो, लव नोट्स आणि वॉयस सोबत म्युजिकही शेयर करु शकतात.

काय खबरदारी घ्यावी ?

  • ऑनलाईन रिलेशनशीपमध्ये घाई करणे धोकादायक ठरु शकते. 
  • रिलेशनशिपमध्ये एकमेकांवर विश्वास जरुर ठेवा, मात्र आपला सोशल नेटवर्किंग साइटचा पासवर्ड शेअर करु नका. 
  • डेटिंगच्या दरम्यान बँक अकाउंड,एटीएम पिन सारख्या गोष्टी शेयर करु नका. 
  • अत्यंत खाजगी गोष्टी शेअर करणे टाळा. 

राज्यात सर्व कोरोना रुग्णांचे उपचार मोफत; खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप

डेटिंग एप्सची उलाढाल

देशात 2020 पर्यंत अडीच कोटी लोक डेटिंग एप्सचा वापर करत आहेत. 2024 पर्यंत ऑनलाईन डेटिंग एप्सच्या युजर्सची संख्या दोन कोटी 68 लाख एवढी होईल अशी अपेक्षा आहे. 2020 पर्यत ऑनलाईन डेटिंग बाजाराची एकुण उलाढाल 6 कोटी डॉलर पर्यंत पोहोचली. या कंपन्या प्रत्येक युजर्सकडून 199 रुपये कमावत आहेत.

special moments love notes and pictures digital love is new trend during lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special moments love notes and pictures digital love is new trend during lockdown