

Palghar Relief Hospital Case
ESakal
पालघर : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात पालघर येथील न्यायालयांत सुरु असलेल्या खटल्यांचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्यात आलेले अॅड. सुधीर हरी गुप्ता यांची नियुक्ती अवघ्या दोन दिवसांतच राज्य शासनाने रद्द केली आहे. विधी व न्याय विभागाने २० नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील नवीन अधिसूचना जारी केली असून नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.