Special Report | मास्कमुळे कोरोना विषाणूचा वेग मंदावतो आयआयटीच्या संशोधकांचा निष्कर्ष

तेजस वाघमारे
Sunday, 10 January 2021

मास्कमुळे कोरोना विषाणूच्या प्रवासाचा वेग नक्कीच मंदावतो यामुळे त्याची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या संशोधनातून समोर आला आहे. 

मुंबई  : कोरोना विषाणूच्या बचावासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी त्याचा किती प्रभाव होतो याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र मास्कमुळे कोरोना विषाणूच्या प्रवासाचा वेग नक्कीच मंदावतो यामुळे त्याची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या संशोधनातून समोर आला आहे. 

 

कोरोनाच्या प्रसाराबाबत जगभरात विविध संस्थांमध्ये संशोधने सुरू आहेत. कोरोनामुळे कफ असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव तातडीने होतो. कफाच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे या आधीच्या अभ्यासातून समोर आले आहे. यावर आयआयटी मुंबईतील प्रा. रजनीश भारद्वाज आणि त्यांच्या टीमने अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली. यामध्ये तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक थेंबामध्ये किती प्रमाणात विषाणूचे प्रमाण असते. याचाही अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे निदर्शनास आले की बाहेर पडणारा कफ त्याच्या आसपासचा दोन मीटरचा परिसरात विषाणूचा फैलाव करू शकतो. मात्र शिंकण्यामुळे बाहेर येणारे तुषार अधिक घातक असल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे जर रुग्णाच्या तसेच त्याच्यासोबतच्या व्यक्तीने मास्क परिधान केला असेल तर त्यामुळे विषाणूचा फैलाव रोखला जाऊ शकतो असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

विषाणूचा प्रभाव आठ सेकंदांपर्यंत असू शकतो. यामध्ये सर्जिकल मास्क आणि एन 95 मास्क याच्या प्रभावाचा विचार करण्यात आला. यामध्ये सर्जिकल मास्कमुळे विषाणू फैलावण्याची क्षमता मास्क नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत सात पटीने कमी होते. तर एन 95 मास्कमुळे अधिक सुरक्षा मिळत असल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. जर मास्क नसलेली एखादी व्यक्ती शिकंली अथवा खोकली तर आपण आपला हात स्वत:च्या तोंडावर धरला तरी विषाणूचा प्रभाव कमी होऊ शकतो असे मत संशोधन प्रा. अमित अग्रवाल यांनी मांडले. या प्रबंध फिजिक्स फ्लुईड या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

Special Report Masks slow down corona virus IIT mumbai researchers find

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Report Masks slow down corona virus IIT mumbai researchers find