"भाई, एक शिवा और दो बुद्धा देना" असं कुणी बोलत असेल तर सावधान ! ड्रग्सच्या काळ्याबाजाराबाबतचा सर्वात मोठा खुलासा

"भाई, एक शिवा और दो बुद्धा देना" असं कुणी बोलत असेल तर सावधान ! ड्रग्सच्या काळ्याबाजाराबाबतचा सर्वात मोठा खुलासा

मुंबई : "भाई, एक शिवा, और दो बुद्धा देना", असे कोणी बोलत असेल तर ते देवांबद्दल बोलत नसून ते ड्रग्स विक्री करत आहेत असे समजा. कारण आता ड्रग्स विक्रेत्यांनी ड्रग्सना चक्क देवता आणि धर्मगुरूंची नावे दिली असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत. एलएसडी ऍसिड पेपर पार्टी ड्रग्स म्हणून ओळखला जातो, त्याच्यात तीन प्रकार आहेत, हाय इंटेसिटीव्ही , नॉर्मल आणि लो इंटेसिटीव्ही.

  • कमी क्षमतेचा थेंब प्रत्येकी 3 ते 4 हजार रुपये, त्याला सांकेतिक भाषेत लॉर्ड शिवा म्हणतात. या पेपरवर शिवाचे चित्र असते. खुल्या बाजारात त्याची किंमत 5 हजार रुपये आहे.
  • मध्यम क्षमतेचा थेंब प्रत्येकी 6 ते 7 हजार, सांकेतिक भाषेत त्याला लॉर्ड गौतम बुद्ध म्हणतात. खुल्या मार्केतमध्ये त्याची किंमत 8 हजार आहे.
  • सर्वात उच्च क्षमतेचा थेंब प्रत्येकी 10 हजार रुपयांचा असून खुल्या बाजारात त्याची किंमत 12 हजार, त्याला सांकेतिल भाषेत दलाई लामा म्हणतात. तो एकदम ओरिजनल असल्यामुळे त्याला असल्यामुळे त्याला दलाई लामा असे म्हटले जाते. खुल्या बाजारात त्याला सर्वाधिक मागणी आहे.

गांजाला घास, मेथी हे कोडवर्ड आहेत. तसेच चरस मध्ये 2 दर्जाचे चरस उपलब्ध आहेत. काश्‍मिरी आणि देहरादूनी अशा दोन प्रकारांमद्ये चरस उपलब्ध असते. काश्‍मिरी चरस हा उच्च प्रतिचा चरस असून मार्केटमध्ये त्याची जास्त मागणी आहे. त्याचात पण 2 प्रति आहेत. एकाला काला पत्थर आणि दुस-याला काला साबुन म्हणतात. देहराधुनी चरसला रबडी असा कोडवर्ड आहे. 

कोकेन हा अमली पदार्थ सर्वात महागडा असून ड्रग माफिया जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा त्याचे कोडवर्ड बदलतात. कोकेनमध्ये बनावट कोकेन सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या बनावट कोकेनला चायना व्हाईट असा कोड आहे, चायना बनावट वस्तूंसाठी प्रसिद्ध असल्यामुळे हे नाव देण्यात आले आहे. कोकेनला मुख्यतः ओजी व्हाईट म्हणतात, तसेच व्हाईट आईस, अशी अनेक नावे देखील कोकेनसाठी वापरली जातात. स्थानिक पातळ्यांवरही या सांकेतिक नावांमध्ये बदल होतो. पूर्वी या ड्रग्ससाठी चित्रपट अभिनेत्रींच्या नावाचा वापरही केला जायचा.

रॉन (एमडी) याला पूर्वी म्याव म्याव, चाची, या नावाने ओळखला जायचा. मात्र या एमडी ड्रगला  माफियांनी यांनी नवीन ओळख करून दिली. त्याला सध्या कपडा किंवा बुक अशी नावं दिली गेली आहेत. एमडी मागणारे 1 बुक, एक मीटर कपडा अशी मागणी करतात.

एलएसडी पेपर हा पार्टीमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. एलएसडीचा लहानसा तुकडा जिभेखाली ठेवला जातो. त्यामुळे नशा करणारे ट्रान्समध्ये जातात. या ड्रग घेणाऱ्यांमध्ये तरुणांचे जास्त प्रमाण आहे. पब, डिस्कोथेबमध्ये याची मोट्या प्रमाणत मागणी आहे. विशेष म्हणजे एलएसडीचा रक्तातील अंश केवळ दोन तासांपुरता मर्यादीत राहतो. त्यामुळे तात्काळ किक बसते व लवकर उतरते. तसेच एखाद्यावेळेस या ड्रग्सचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या रक्ताची दोन तासांनंतर तपासणी केली, तर त्याचा अहवाल निगेटीव्ह येतो. त्यामुळे कायदेशिर कचाट्यातून न अडकण्यासाठी धनाढ्य या ड्रग्सचा मोठ्याप्रमाणात वापर करतात. रेव्ह पार्ट्यामध्ये विशेष करून याच ड्रग्सचा वापर होतो. 

( संपादन - सुमित बागुल )

special story on list of code words used by peddlers to sale illegal and banned things in india

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com