Valentines Day | पुरुष आणि महिलांना व्हॅलेन्टाईन्स डे बाबत नक्की काय वाटतं, जाणून घ्या स्पेशल सर्व्हेच्या माध्यमातून

Valentines Day | पुरुष आणि महिलांना व्हॅलेन्टाईन्स डे बाबत नक्की काय वाटतं, जाणून घ्या स्पेशल सर्व्हेच्या माध्यमातून

मुंबई : 92 टक्के अविवाहीत स्त्री, पुरुष त्यांच्या जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाची बाब म्हणजे  या सर्वांना आयुष्यभराच्या जोडीदाराची अपेक्षा नाही, तर प्रेम करणारा रोमँटिक पार्टनर हवा आहे. येत्या व्हँलेटाईन डे च्या पार्श्वभूमीवर एका मॅट्रीमॉनीने संकेतस्थळाने सर्वेक्षणातून ही माहिती जाणून घेतली आहे.

  • 86 टक्के स्त्री, पुरुषांनी लग्नानंतर ते जोडीदारासमवेत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात
  • 2 टक्के महिला आणि 43 टक्के पुरुषांनी व्हँलेटाईन डे साजरा करणे महत्वाचे आहे असं मानतात.
  • व्हॅलेन्टाईन्स डे मुळे वैवाहिक बंधनांना अधिक बळकटी मिळण्यास मदत होते असं देखील काहींनी म्हंटले आहे
  • 52 टक्के महिला आणि 37 टक्के पुरुषांच्या मते व्हॅलेंटाईन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस आहे.
  • लग्नानंतरचा व्हलेंटाईन डे साजरा न करु शकणाऱ्यामध्ये 4 टक्के महिला आणि 6 टक्के पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्या मते लग्नाचा वाढदिवस आणि जोडादाराचा वाढदिवस व्हलेंटाईन दिवसापेक्षा अधिक महत्वाचे असतात.
  • 5 टक्के पुरुष 5 टक्के महिलांच्यामते व्हलेंटाईन डे हा केवळ मार्केटींगचा फंडा आहे.
  • व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या जोडीदाराने प्रेम व्यक्त करावे असे 55 टक्के महिलांना वाटते.   
  • केवळ 20 टक्के महिलांना या दिवशी त्यांच्या पतीकडून काहीतरी भेटवस्तू हवी आहे असं वाटतं. तर 33 टक्के पुरुषांना या दिवशी पत्नीला भेटवस्तू दिली पाहीजे असे वाटते.
  • 27 टक्के पुरुषांना या दिवशी प्रेम व्यक्त करायचे आहे. 19 टक्के पुरुषांना आपल्या पत्नीला व्हँलेटाईन डेच्या दिवशी रोमँटीक डिनरला घेऊन जायचे आहे. 14 टक्केंना या दिवशी कुठेतरी सुट्टी साजरी करण्याची इच्छा आहे.

'लग्नानंतर आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात चांगला दिवस कुठला आहे. असं विचारल्यावर 86 टक्के महिला आणि 74 टक्के पुरुषांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला पहिली पंसती दर्शवली आहे.

6 टक्के महिला, 13 टक्के पुरुषांना  वाढदिवसाला एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करायला आवडते. केवळ 8 टक्के महिला आणि 13 टक्के पुरुषांना 'व्हलेंटाईन डे'च्या दिवशी प्रेम व्यक्त करायला आवडते. 

लग्नांनतर 'व्हलेंटाईन डे'  सेलिब्रेशनसाठी कुणी पुढाकार घ्यायला पाहीजे यावर 10 टक्के महिलांनी पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा, तर 10 टक्के व्यक्तींनी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा असे म्हटले आहे. तर 50 टक्के जोडीदारांनी दोघांनीही सेलिब्रेशनसाठी पुढाकार घ्यायला हवा असं मत व्यक्त केले आहे.

'व्हलेंटाईन डे'च्या दिवशी पत्नीला भेटवस्तू देणे किती महत्वाचे आहे. यावर 55 टक्के पुरुषांनी  या दिवशी भेटवस्तू देण्यास ते विसरणार नाही असे सांगीतले तर 86 टक्के महिलांनी भेटवस्तू देणे महत्वाचे नाही असं मत आहे. मात्र 14 टक्के महिलांनी या दिवसाला भेटवस्तू विसरणे चांगले नाही असं मिश्किलपणे सांगीतले.

 भारत मॅट्रीमॉनीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत 5628 सदस्यांच्या प्रतिक्रीया घेण्यात आल्या.

special survey done by matrimony site amid valentines day reactions of male and females

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com