भंडारा जळीत प्रकरणाची चौकशी मुंबई अग्निशमन दलाकडे

मिलिंद तांबे
Wednesday, 13 January 2021

ही समिती दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे विभागीय अग्निशमन अधिकारी ए व्ही परब यांनी संगतीतले. 

मुंबई, ता. 13 : भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाची चौकशी मुंबई अग्निशमन दल करत आहे. यासाठी 3 उच्च अधिकाऱ्यांची समिती भांडाऱ्याला रवाना झाली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. भंडारा जळीत  प्रकरणाच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमनदल या प्रकरणाची चौकशी करणार आहे. यासाठी अतिरिक्त अग्नी सुरक्षा संचालक प्रभात रहंगदले यांच्या नेतृत्वात 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी : माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार  मूर्तिकार आणि कारागिरांना केंद्राचा दिलासा 

समितीने भांडाऱ्यात जाऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. या घटनेची फॉरेन्सिक चौकशी  केली जाणार आहे. यासाठी फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदत देखील घेण्यात आली आहे. आग नेमकी कुठे लागली, नेमक्या कुठल्या कारणामुळे आग लागली? आगीच्या मागे इतर काही कारण आहे का ? याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर आगीचे नेमके कारण, आग विझवण्यात उशीर झाला का? याचाही संपूर्ण उलगडा होण्यास मदत मिळणार आहे. 

मुंबईतील सर्व महत्त्वाच्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Read all latest marathi news from mumbai

तीन सदस्यीय समितीने भंडाऱ्यात घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर तेथील जळालेले काही नमुने तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहेत. ही समिती दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे विभागीय अग्निशमन अधिकारी ए व्ही परब यांनी संगतीतले. 

special team from mumbai firefighting department wil investigate bhandara hospital fire case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special team from mumbai firefighting department will investigate bhandara hospital fire case