मुंबई ते अमरावती विशेष ट्रेन | लवकरच IRCTC च्या संकेतस्थळावर आरक्षण सुरू

कुलदीप घायवट
Wednesday, 20 January 2021

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट दैनिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. 

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट दैनिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही (02111) सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी मंगळवार, 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रोज सायंकाळी 7.55 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 7.55 वाजता अमरावतीला पोहोचेल. ही गाडी (02112) सोमवार, 25 जानेवारीला अमरावती येथून रोज 7.10 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 6.15 वाजता पोहोचेल.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे देण्यात आले आहेत. या विशेष गाडीसाठी आरक्षण सामान्य दरानुसार शुक्रवार (ता. 22) पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या गाडीतून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना चढण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानाच्या वेळी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Special train from Mumbai to Amravati Reservation on IRCTC website soon

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special train from Mumbai to Amravati Reservation on IRCTC website soon