esakal | सामाजिक संघटनांची दादरमध्ये निदर्शने; दहशतवादी हल्ल्याचा निषेध | Terrorist Activity
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist attack

सामाजिक संघटनांची दादरमध्ये निदर्शने; दहशतवादी हल्ल्याचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडाळा : गेल्या काही महिन्यांत श्रीनगर-काश्मीर (srinagar-kashmir) येथील अल्पसंख्याक आणि इतर नागरिकांना (minority people) लक्ष्य करत केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (terrorist attack) निषेधार्थ आज दादर (dadar) पूर्व स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरासमोर (hanuman temple) विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत हातात फलक घेऊन व जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. तसेच भाजप सरकारचाही (bjp Government) निषेध केला.

हेही वाचा: मुंबई: पश्चिम रेल्वेवर रशियन बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे

भारताच्या संविधानाप्रति निष्ठा असणारा प्रत्येक नागरिक हा मानवतावादाच्या समर्थनार्थ कोणत्याही दहशतवादाचा विरोध प्राणपणाने करेल. मानवतावादाची जपणूक करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिली. या वेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेल्वेच्या जीआरपी व आरपीएफ पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

loading image
go to top