मंत्रालयाच्या गेटवरून निघाला आणि स्वत:वरच गोळी झाडली, SRPF जवानाचा मृत्यू

मंत्रालयाच्या गेटवरून निघाला आणि स्वत:वरच गोळी झाडली, SRPF जवानाचा मृत्यू

मुंबईच्या डोंगरी परिसरात राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पुष्कर शिंदे असं या शिपायाचं नाव आहे. त्याने त्याने एसएलआर रायफल ने स्वतःला माने खाली गोळी मारून घेतली. त्याने हे कृत्य का केलं, याबाबत कोणताही उलगडा झालेला नाही.

तसेच त्याच्या कुटुंबीयांनीही अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्याची प्रक्रिया सुरू असून आजच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (SRPF soldier killed himself)

पुष्कर हा परिमंडळ १ कार्यक्षेत्रात मंत्रालयाच्या मुख्य गेटवर येथे कर्तव्यात होता. या ठिकाणी बंदोबस्तात तो उपस्थितही होता. राज्य राखीव दलाच्या पुण्यातील डी कंपनीतील गट क्र. २ मध्ये तो सेवा देत असून त्याच्या प्लॅटूनचा क्रमाांक १ होता.

घटना घडल्यानंतर तत्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. मंत्रालयातील नाईट शिफ्ट संपल्यानंतर कर्तव्य संपल्यानंतर प्लाटून म.न.पा. शाळा, डोंगरी येथे आल्यानंतर ९.५० वा हे कृत्य केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com