SSC Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचायलाच हवी अशी बातमी; शिक्षण मंडळाचा निर्णय

SSC Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचायलाच हवी अशी बातमी; शिक्षण मंडळाचा निर्णय

मुंबई  : सन 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार विद्यार्थांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. मंडळाने 2 फेब्रुवारीपर्यंतदिलेल्या या मुदतीत विद्यार्थांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. त्यानंतर मात्र अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 3 ते 13 फेब्रुवारीपर्यंत आहे. नियमित विद्यार्थी तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी, श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन परीक्षा अर्ज भरू शकतात. तसेच 17 नंबरचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत स्वतंञपणे कळविण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

खाजगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा

दहावी, बारावी परीक्षेला खाजगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थांना नाव नोंदी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. या कालावधीत नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यास पात्र ठरलेल्या विद्यार्थांना भ्रमनध्वनी व मेलवर संदेश प्राप्त होतील. या विद्यार्थांनी संकेतस्थळावरून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. तसेच नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या विद्यार्थाना 13 फेबुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

SSC Exam The State Board Education has given an extension to fill up the application form for the 10th examination

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com