esakal | ST, RTO कर्मचारी 'कोविड वाॅरियर्स'च्या यादीतून बाहेर

बोलून बातमी शोधा

ST-Bus-RTO-Officers
  • कोरोनाकाळात ST महामंडळात 200 कर्मचाऱ्यांनी गमावला जीव

  • RTOमध्ये तीन अधिकाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

  • कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला

ST, RTO कर्मचारी 'कोविड वाॅरियर्स'च्या यादीतून बाहेर

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: जागतिक कोरोना महामारीच्या संकटात राज्यभरातील अनेक विभाग फ्रंटलाईनवर काम करत आहे. यामध्ये एसटी महामंडळसुद्धा अत्यावश्यक सेवेत कामगीरी बजावत असून आतापर्यंत 200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी जीव गमावला आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील ३ अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. तर सध्या राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत पोहचविण्याचे काम परिवहन विभाग करत आहे. मात्र, त्यानंतरही कोविड वाॅरियर्सच्या यादीतून वगळण्यात आल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने कोविड वाॅरियर्सची यादी तयार केली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्व विभागाचा उल्लेख आहे. तर त्या-त्या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये कोरोना काळात परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या सिमेवर पोहविणे, परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणणे, बेस्ट उपक्रमात मुंबईकरांना सेवा देणे, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सुरक्षीत त्यांच्या कर्तव्यावर पोहचविण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. तर प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरिक्षक, सहाय़्यक, आरटीओ अधिकारी यांनी परप्रांतीयांची वाहतूकीची व्यवस्था, सध्या राज्यातील ऑक्सिजनचा पुरवठा, टँकर्सचे रुपांतरण, बसेसची तपासणीसह संपुर्ण महामारीत कर्तव्य बजावले आहे.

हेही वाचा: Corona Fighter : कोरोनाबाधितांचे कपडे धुणारा 'अवलिया'! कौतुकाची थाप देत कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित

त्यानंतर 7 हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी बाधीत होऊन 200 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. तर परिवहन विभागात सुद्धा शेकडो अधिकारी कर्मचारी बाधीत होऊन तिन अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. मात्र, कोविड वाॅरियर्सच्या यादीत समावेश केला नसल्याने, लसीकरण सुद्धा मिळत नसून, मृत्युनंतर विमा सुरक्षेचा लाभ सुद्धा मिळत नसल्याने एसटी आणि परिवहन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱी संघंटनांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी ज्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला त्यांच्या कुटूंबीयांना 50 लाखांचे विमा सुरक्षेचा लाभ मिळण्यात यावा यासाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र, त्यामध्ये काही त्रुट्या काढण्यात आल्या होत्या, त्या सुद्धा दुरूस्त करून पाठवल्या आहे. मात्र, अजुनही यासंदर्भात निर्णय झाला नाही. मात्र, परिवहन विभाग कोविड वाॅरियर्स म्हणून सुरूवातीपासून अहोरात्र काम करत आहे.

- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

हेही वाचा: LIVE: ३ कोटी ९४ लाख नागरीकांना शिवभोजन थाळीचा लाभ - उद्धव ठाकरे

केंद्र सरकारच्या कोविड योद्धा यादीत एसटी कर्मचारी सोडून इतरांना स्थान दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी डॉक्टर, नर्स, महापालिकेचे कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक जोखीम पत्करून केली आहे. परप्रांतीयांची वाहतुक केली आहे. त्यामूळे आतापर्यंत 200 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून साडेसात हजार कर्मचारी बाधित होऊनही कोविड योद्धा यादीत नाव नसणे हे निंदनीय आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

- श्रीरंग बरगे,सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

------

रुग्णवाहिकेची कमतरता असलेल्या ठिकाणी रुग्णवाहीकेचा पुरवठा करने, ऑक्सिजनसाठी लागणारे टँकर्स रुपांतरीत करून संबंधीत जिल्ह्यात पोहचविणे, त्यासोबतच परप्रांतीय मजुरांच्या सुविधा करने, बसेस तपासणी करण्याचे काम करूनही अद्याप फ्रंट लाईन वर्कर्स मध्ये नोंद केली नाही त्याची खंत आहे. त्यामूळे राज्य शासनाने आतातरी फ्रंट लाईन दर्जा देऊन विमा सुरक्षा आणि तात्काळ लसीकरण द्यावे

- रुक्मिणीकांत कळमणकर, अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी संघटना

------

हेही वाचा: उद्धव ठाकरे गप्प आहेत, कारण... - प्रवीण दरेकर

कोविड वाॅरियर्सची यादी

एमबीबीएस - 1 लाख 45 हजार 848

एमबीबीएस विद्यार्थी - 16 हजार 900

नर्सेस - 1 लाख 23 हजार 797

दंतवैद्यकीय (डेंटीस्ट) - 31 हजार 717

फार्मासिस्ट - 2 लाख 33 हजार 322

आयुष - 1 लाख 54 हजार 783

CPSES हाॅस्पिटल - 14

ESIC हाॅस्पिटल - 3

रेल्वे हाॅस्पिटल - 3

ऑर्डिनन्स अँड HIL हाॅस्पिटल - 4

पोर्ट हाॅस्पिटल - 2

लॅब व्हाॅलेंटियर्स - 5 हजार 418

एक्स सर्विसमॅन - 3 हजार 432

NYKS - 1 लाख 31 हजार 689

एनएसएस - 2 लाख 82 हजार 435

एनसीसी - 700

पिएमकेव्हीवाय - 2 हजार 635

एनयुएलएम वर्कर्स - 8 हजार 354

डीडीयु जिकेवाय - 2 हजार 515

पंचायत सेक्रेटरी - 13 हजार 408

ग्राम रोजगार सेवक - 29 हजार 272

आशा - 72 हजार 895

अंगणवाडी - 1 लाख 98 हजार 786

वेटरनरी डाॅक्टर्स - 5 हजार 563

फायर सर्विसेस - 23 हजार 211

होमगार्ड्स - 1हजार 8 हजार 694

सिव्हील डिफेन्स - 57 हजार 394

पोस्टमॅन आणि ग्रामसेवक - 11 हजार 812