esakal | राज्यातील STचा प्रवास महागणार, अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची प्राथमिक चर्चा

बोलून बातमी शोधा

राज्यातील STचा प्रवास महागणार, अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची प्राथमिक चर्चा

एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल केला असून, त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे.

राज्यातील STचा प्रवास महागणार, अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्र्यांची प्राथमिक चर्चा
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: राज्यात सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीमुळे एसटीचा खर्च वाढतो आहे. त्यातुलनेत उत्पन्न मात्र घटले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल केला असून, त्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेलच्या दरवाढीमुळे झालेल्या आर्थिक तोट्याचा अहवाल परिवहन मंत्र्यांनी मागितला असून, भविष्यात सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे आधीच एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. शिवाय एसटीच्या ताफ्यातील वाहनांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. परिणामी उत्पन्नात घट झाल्याने, गेल्या वर्षात एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे सुद्धा कठीण झाले होते. त्यामध्येच नवीन वर्षात सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने, उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे एसटीच्या प्रवासांमध्ये वाढ करून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न महामंडळाचा सुरू आहे. नुकतेच भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला असून, त्यावर प्राथमिक चर्चा सुद्धा एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांची सुद्धा झाली आहे. दरम्यान सततच्या डिझेल दरवाढीमुळे झालेले नुकसान आणि भविष्यात होणाऱ्या नुकसानीचा अहवाल मागितला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर यावर चर्चा करून दरवाढी संदर्भात निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

डिझेल दरवाढीमुळे दररोज 1 कोटीचे नुकसान

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात डिझेलचे दर 66 रूपये प्रति लिटर होते. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 13 रूपयांनी वाढ होऊन 79 रूपये प्रति लीटर दर झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दरवाढीमुळे दैनंदिन 1 कोटी रूपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

हेही वाचा- मुंबईत पुन्हा धमाके, यारी रोडवर स्फोटाचे आवाज ऐकून परिसरात घबराट

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

ST Corporation submitted proposal state government increase fares ST bus