esakal | एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालकच बनला देवदूत, जीवावर उदार होऊन अशी करताय मदत
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

लॉकडाऊनमुळे एसटीच्या विठ्ठलवाडी आगारातील अनेक एसटी चालक- वाहक अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना येथील एसटी चालक सुनील धिडे दररोज जेवण, तसेच गावी असणाऱ्या आजारी एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईतून औषधपुरवठा करत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालकच बनला देवदूत, जीवावर उदार होऊन अशी करताय मदत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कल्याण : लॉकडाऊनमुळे एसटीच्या विठ्ठलवाडी आगारातील अनेक एसटी चालक- वाहक अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना येथील एसटी चालक सुनील धिडे दररोज जेवण, तसेच गावी असणाऱ्या आजारी एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईतून औषधपुरवठा करत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी धिडे देवदुतासारखे धावून आल्याचे हे एसटी कर्मचारी सांगत आहेत.

मोठी बातमी : मातोश्रीच्या दारावर पुन्हा कोरोनाची ठकठक, आणखी तीन पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

कल्याण पूर्व मधील विठ्ठलवाडी आगारातील मध्ये मागील 14 वर्षापासून सुनील किसन धिडे (45) चालक म्हणून काम करत आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर होताच, सर्व वाहतूक ठप्प झाली होती. अशा वेळी धिडे विठ्ठलवाडी आगारात अडकून पडलेल्या चालक-वाहकांना घरातून जेवण देत आहेत. 
सुनील धिडे यांना मधुमेहाचा आजार असताना देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दुपारी बारा वाजता बदलापूर ते मुंबई एसटी बसने सोडतात. इतकेच नाही तर राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना जाहिर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यातील 50 टक्के रक्कम ते मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेत लॉकडाऊन काळात एक कर्मचारी आजारी असल्याचे समजताच त्याला धिडे यांनी गावाकडे औषधे देखील पाठवून दिली.  

नक्की वाचा : धक्कादायक ! उपचारांनंतरही फुफ्फुसांमध्ये लपून राहतो कोरोना? काय सांगतायत वैज्ञानिक?

मी कॅन्सर रुग्ण (ऑस्टोमेट) आहे. मला मलविसर्जनासाठी पोटावर पर्यायी व्यवस्था (स्टोमा) बनवून त्यावर प्लॅस्टिकची बॅग लावावी लागते. मात्र या बॅगा केवळ मुंबईतच मिळतात. मी गावी अडकल्यामुळे मला बॅगा मिळणे अशक्य झाले. मी माझी अडचण धिडे यांना सांगितली असता त्यांनी कराडला बॅगा पाठवून दिल्या. 
- एम. डी. जाधव, वाहक, राज्य परिवहन महामंडळ.

ST driver provide Food and medicine ST employee during the lockdown

loading image