तोटा भरून काढण्यासाठी STच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात

तोटा भरून काढण्यासाठी STच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात

मुंबई: कोरोना काळात एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक धोक्यात आली तरी सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात महामंडळाने सरत्या वर्षात केली आहे. कोरोनामुळे प्रवासी घटले तर उत्पन्नावरही प्रचंड परिणाम झाला असल्याने नवीन वर्षात आर्थिक संकटात असलेल्या एसटीला उभारी देण्याचे आव्हान महामंडळाला पेलावे लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागांवर पेट्रोल -डिझेल, सीएनजी-एलनजी पंप सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने यावर्षी परवानगी दिली आहे. त्यासोबत आर्थिक स्रोत निर्माण करण्यात एसटीने मालवाहतूक सुरू केली आहे. त्यासोबतच टायर रिमोट 
टायर रिमोल्डिंग, एस.टी महामंडळाच्या कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन, नाथजल शुद्ध पेयजल योजना,  व्हिटीएस प्रवासी माहिती प्रणाली, मराठा आरक्षण आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी, कोविड - 19 काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना  सानुग्रह अनुदान आणि  विविध बस खरेदीसह मुंबईतील बेस्ट उपक्रमातही एसटीने नागरिकांना प्रवासी सेवा दिली आहे.

  • पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी पंप
  • राज्यभरातील महामंडळाच्या निवडक 35 मोक्याच्या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर भागीदारीतून पेट्रोल - डिझेल, सीएनजी -एलनजी पंप सुरु करण्यात येणार आहे. 
  • एसटीची 1050 मालवाहू वाहने तयार आहेत. 31 ऑक्टोबर अखेर 41 हजार फेऱ्यातून तब्बल 21 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. भविष्यात प्रभावीपणे मालवाहतूक करण्याचा एसटीचा प्रयत्न आहे.
  • एसटीचे 9 टायर रिमोल्डिंग प्लांट आहेत. त्यामद्ये एसटीचे काम करून आता खासगी व्यावसायिकांचे टायर रिमोल्डिंग करून देण्यास सुरुवात केली आहे.
  • एसटीने प्रवाशांसाठी कॅशलेस स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहे. त्यामुळे भविष्यात सामाजिक अंतर ठेवून स्मार्टकार्डद्वारे तिकीट काढणे शक्य होईल.    
  • एसटी महामंडळाची राज्यभरात 608 बसस्थानके आहेत. या बसस्थांनकावर एसटीची नाथजल पाण्याची एक लिटर आणि 650 मिली-लिटरच्या बाटली बंद विक्रीतुन उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न आहे.
  • व्हिटीएस प्रणालीच्या माध्यमातून वाहनांची योग्य माहिती देण्यात येत आहे.
  • मराठा आरक्षण आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
  • कोरोनाकाळात कोविड- 19 मुळे मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान दिल्या जात आहे.
  • 700 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • मुंबईतील बेस्ट उपक्रमात अद्याप एसटी मुंबईकरांना प्रवासी सेवा देत आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

ST efforts make up for loss innovative initiatives began during Corona period

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com