ST History: लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या

History of ST Maharashtra | १९६८ मध्ये पुणे-जळगांव मार्गावर पहिली रातराणी सेवा धावली |
 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
ST History:sakal

Mumbai News: पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली एसटी   १ जून, १९४८ रोजी धावली. या घटनेला यंदा दि. १ जून रोजी ७६ वर्षे पूर्ण झाली.

अर्थात, एसटीचे हे अमृत महोत्सवी वर्धापन वर्ष आहे. त्यानिमित्त ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या आजवरच्या प्रवासाचा आणि आधुनिकतेकडे सुरु झाला आहे.  

गेली ७६ वर्षं ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गावखेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय!’ हे ब्रीद घेऊन एसटी सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आली आहे.लालपरी पासून सुरु झालेला प्रवास अत्याधुनीक ‍इलेक्ट्रिक बस  ई-शिवनेरी पर्यंत आला आहे.  

 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

१ जून १९४८ रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली बस धावली. यापुर्वी तत्कालीन मुंबई राज्यात खाजगी वाहतूक अस्तित्वात होती.

सदरचे वाहतूकदार हे नफा असलेल्या मार्गावरच वाहतूक करत असल्याने शासनाला वाहतूक सेवेचे पुन:स्थापिकरण करणे गरजेचे वाटले.

प्रवासी वाहतूकीचे पुर्णत:राष्ट्रीयकरण करण्याकरीता सन १९४७ मध्ये योजना तयार करण्यात आली. स्वतंत्र भारतामध्ये प्रवासी वाहतूकी करिता परिवहन खाते स्थापन करणारे तत्कालीन मुंबई राज्य हे देशाचे पहिले राज्य बनले.

 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
Mumbai ST News : एसटीच्या आरक्षणात तीन लाखांची वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट विक्रीला उदंड प्रतिसाद

--

•    १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर एसटी विभागाची पुर्नरचना करून महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आले.

•    नोव्हेंबर १९६४ पासून वातानुकूलित बस एसटीने चालनात आणली.

•    १९६८ मध्ये पुणे-जळगांव मार्गावर पहिली रातराणी सेवा धावली.

•    ९ वी आशियाई ‍ क्रिडा स्पर्धा सन १९८२ मध्ये दिल्ली येथे झाली होती. सदरच्या क्रिडा स्पर्धेत खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पार पाडली होती. सदरच्या वाहतूकीसाठी २० आराम व १८० निमआराम बसगाडयांचा वापर करण्यात आला होता.

•    १९८३ पासून या निमआराम बस दादर-पुणे मर्गावर प्रथम वापरण्यात आल्या. त्या एशीयाड या नावाने मध्यमवर्गीय प्रवाशांमध्ये आजही लोकप्रिय आहेत तिला सध्या "हिरकणी" म्हणतात.

•    दि.२८ डिसेंबर,२००२ पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील आधारीत व्होल्वो वातानुकूलीत सेवा कार्यान्वित केली होती ती "शिवनेरी" या नावाने ओळखली जाते.

•    अजंठा लेणी येथे लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी अजंठा टी-जंक्शन ते अजंठा लेणी या मार्गावार केवळ राज्य परिवहन सेवा कार्यान्वित आहे.

•    १० जून, २०१७ मध्ये शिवशाही ही वातानूकूलीत बससेवा चालनात आली. मध्यमवर्गीयांना किफायतशीर दरात वातानूकूलीत प्रवास घडावा या उददेशाने "शिवशाही" बसचा जन्म झाला.

•    लांब पल्याच्या प्रवासामध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा या उददेशाने शयन व आसनी असे दोन्ही पर्याय असलेली बस सेवा महामंडळाने चालनात आणली.

•    १ जून,२०२२ मध्ये पर्यावरणपूरक विदयुत घटावर चालणारी "शिवाई" बस पुणे अहमदनगर मार्गावर धावू लागली.

•    १ मे,२०२३ पासून मुंबई-पुणे मार्गावर "ई-शिवनेरी" ही अत्याधुनीक ‍इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली.

 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
Maharashtra Industrial Policy : राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगांबाबत उपाय शोधण्यासाठी अभ्यास समिती

 सध्या १३ हजार विविध प्रकारच्या बसेसव्दारे एसटी दररोज सरासरी ५४ लाख प्रवाशांना सुरक्षित व किफायतशीर प्रवासी सेवा पुरवते आहे.आजच्या तारखेला राज्यातील ९७ टक्के जनतेपर्यंत एसटी पोहचली आहे.अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत सुरक्षित आणि मोफत प्रवास एसटी घडविते.

विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा  मुख्य आधार एसटीच आहे.सर्व सामान्य जनतेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडूरंगाच्या दर्शनाला घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीच पेलते. प्रत्येक वारीला लाखो वारकरी विठुमाऊलीच्या दर्शनाला एसटीने जातात.

 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
St News: लोकसभा निवडणुकीसाठी लालपरी सज्ज, करणार लाखोंची कमाई

दोन योजनांमुळे एसटीला उभारी

महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून प्रवास करताना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे.  सध्या दररोज २० ते २२ लाख महिला अर्ध्या ‍तिकिटात एसटीने प्रवास करतात.

मुख्यमंत्री यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या सर्व नागरीकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस मधून मोफत प्रवासची  घोषणा केली होती. हि  सवलत २६ ऑगस्ट,२०२२ पासून देण्यात येत आहे. दररोज ५-६ लाख अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात. या दोन योजनांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला उभारी मिळाली आहे.

 लालपरी ते ई-शिवनेरी; कसा राहिलाय एसटीचा 76 वर्षांचा प्रवास? जाणून घ्या
ST News: अवैध प्रवासी वाहतुकीची एसटीला झळ; प्रवासी संख्या होतेय कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com