अत्यावश्यक सेवेसाठी एसटीच्या बसेस वाढणार; नव्याने सोडणार 70 बसेस..

st bus
st bus
Updated on

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई उपनगरांमध्ये कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर पोहचण्यासाठी एसटी आणि बेस्टची  सेवा सुरू आहे. मात्र राज्य सरकारने आता 15 टक्के उपस्थिती आणि खासगी क्षेत्रात 10 टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे आता अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतांना दिसत असल्याने शुक्रवार पासून एसटी पुन्हा आपल्या 70 बसेस वाढवणार आहे. 

हेही वाचा: अरे वाह! मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे काम प्रगतीपथावर; मजूरांच्या स्थलांतराचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही..
 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी या सर्वांना ने-आण करण्यासाठी एसटीच्या तब्बल 574 बसेसद्वारे दैनंदिन सुमारे एक हजार पेक्षा जास्त फेऱ्या केल्या सुरू आहे. त्यातून सुमारे 15 हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण एसटीच्या बसद्वारे केली जात आहे. 

मात्र, शासकीय आणि खासगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, एसटी आणि बेस्टची सेवा हाऊसफुल्ल धावतांना दिसून येत आहे. त्यामूळे एसटी महामंडळाने 8 जुन रोजी अतिरिक्त 250 बस सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर ही गर्दी कमी होत नसल्याने शुक्रवारपासून पुन्हा नव्याने 70 बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

"एसटीने सुरूवातीला अत्यावश्यक सेवेसाठी 200 गाड्या सोडल्या होत्या त्यानंतर 1 जुन रोजी एकूण 462 गाड्या झाल्या, त्यानतंर 8 जुन रोजी 574 एकूण गाड्या आता रस्त्यावर धावत आहे. त्यामध्ये उपनगरातील बेस्टचा काही फेऱ्या शुक्रवारपासून एसटीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामूळे एसटी शुक्रवारपासून नव्याने 70 बसेस सोडणार आहे", अशी माहिती एसटीचे महाव्यवस्थापक राहूल तोरो यांनी दिली आहे. 

ST will provide more 70 buses for essential service 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com