ST Worker Strike | वडापावचं आमिष अंगलट? एसटी कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st workers strike morcha

वडापावचं आमिष अंगलट? एसटी कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात

एसटी कर्मचारी आझाद मैदानातून पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. (ST worker strike)

मात्र काही काळानंतर कर्मचारी ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांना १८ क्रमांकाच्या फलाटावर नेलं.

हेही वाचा: 'आपल्या बापाला काहीही...' सदावर्ते कोर्टात हजर होण्यापूर्वी चिथावणीखोर मेसेज व्हायरल

यानंतर त्यांनी हालण्यसाठी नकार दिल्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनसवर संपकऱ्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहण्याचं ठरवलं. याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत वडापावचं आमिष दाखवलं. यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं. (st worker strike latest news)

हेही वाचा: '१२ तारखेला बारामतीला जाणार असं म्हटलं होतं, पण आता...' दादांचा रोख कोणाकडे?

वडापावची बातमी संपकऱ्यांमध्ये पसरली. कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी 'वडापाव मिळेल, असं सांगितलं. सगळ्यांनी 18 नंबर फलाटावर चला' असं आश्वासनही दिलं. आणि तेच वडापाव खाण्यासाठी 18 क्रमांक फलाटावर आलेल्या एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वडापावची हाव अंगलट आल्याची चर्चा आहे. यासंदर्भात 'साम'ने वृत्त दिलंय.

Web Title: St Workers Protests On Csmt For Murger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ST Worker Strike
go to top