मिरा-भाईंदरमध्ये मुद्रांक व नोंदणी शुल्क घोटाळा? मनसेकडून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

मिरा-भाईंदरमध्ये मुद्रांक व नोंदणी शुल्क घोटाळा? मनसेकडून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात भाडे करारामध्ये लागणारे मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेचे मिरा रोड उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांनी केला आहे. 
पत्रकार परिषद घेत पोपळे यांनी यासंदर्भात बारकोड नसलेले दस्तावेज सादर केले. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी मनोज वावीकर व पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे तक्रार करून फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोपळे यांनी केली आहे. 

शहरातील काही नोंदणीकृत एजंट बोगस दस्तावेज बनवत असल्याची माहिती पोपळे यांनी दिली. एका व्यक्तीस आयकर विवरण पत्र दाखल करताना भाडे करारासंबंधित माहिती द्यावयाची होती. तेव्हा एका व्यक्तीने नोंदणी चलनाची ऑनलाईन पडताळणी केली असता संकेतस्थळावर त्या क्रमांकाचे चलन कोठेही आढळून आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे यावर बारकोडदेखील नव्हता. त्यामुळे या व्यक्तीने पोकळे यांच्याकडे तक्रार केली होती. 

रॅकेट असल्याचा आरोप - 
मिरा-भाईंदर शहरात एका नोंदणीकृत एजंटमार्फत महिन्याला किमान हजाराहून अधिक भाडेकराराचे मुद्रांक व नोंदणी शुल्क भरले जाते. या प्रकरणात मोठे रॅकेट सहभागी असल्याचा आरोप पोपळे यांनी केला आहे. दरम्यान याबाबत संबंधितांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी मिरा-भाईंदर शहराध्यक्ष हेमंत सावंत, मिरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष संदीप राणे उपस्थित होते. 

Stamp and registration fee scam in Mira Bhayandar? MNS demands inquiry from CM

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com