सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करा, अन्यथा आंदोलन करणार; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत

सामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करा, अन्यथा आंदोलन करणार; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत
Updated on


मुंबई  : मार्च अखेरीपासून मुंबई उपनगरीय लोकल सेवा सामान्य प्रवाशांसाठी ठप्प झाली आहे. मागील दहा महिन्यापासून कष्टकरी, श्रमिक, खासगी नोकरदार वर्ग रस्ते वाहतुकीने प्रवास करत आहेत. बसने प्रवास करताना नागरिकांना गर्दीशी सामना नागरिकांना करावा लागत आहे. तर, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करून आर्थिक तोटा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन सामान्य प्रवाशांसाठी तातडीने सुरु करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा आक्रमक पवित्रा रेल्वे प्रवासी संघटनांनी घेतला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांचे कोरोना आणि लॉकडाऊन काळात हाल झाले आहे. यापेक्षा जास्त हाल अनलॉक काळात होत आहे. खासगी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद झाले आहे. त्यामुळे या प्रवाशांना पर्यायी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मात्र हा प्रवास खिशाला परवडणारा नाही. अशीच अवस्था इतर कर्मचारी, श्रमिक वर्गाची झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी सध्या समाज माध्यमावरून  आंदोलन सुरु आहे. 

सामान्य प्रवाशांसाठी सकाळी 7 च्या आधी आणि रात्री 10 च्या नंतर लोकल प्रवास करण्याची चर्चा सुरु आहे. मात्र सामान्य प्रवासी रात्रपाळीमध्ये काम करत नाही. त्यामुळे खासगी नोकरदारवर्ग, सामान्य प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यँत लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. यासह सरकारी आणि खासगी कार्यालयाच्या वेळा, सुट्ट्या बदलण्यात आल्या पाहिजेत. जेणेकरून लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होणार नाही, अशी भूमिका रेल्वे  प्रवासी संघटनेकडून मांडण्यात आली. 

कोरोना आणि लॉकडाऊन काळात सर्वसामान्य माणसाचे खूप हाल झाले आहेत. अनलॉकमध्ये परिस्थिती ठप्प झालेले व्यवहार सुरु झाले आहेत. मात्र मुंबईची जीवनवाहिनी बंद असल्याने हातावर पोट असलेल्या सर्व सामान्य प्रवाशांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आता पत्रव्यवहार करणे बंद करून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे. 
मनोहर शेलार,
अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ 

सध्या आपत्कालीन काळ सुरु आहे. त्यामुळे पत्रव्यवहार करून, समाज माध्यमावर मागणी मांडण्यात येत आहे. मात्र त्याला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन त्यांचा विरुद्ध आवाज उठविण्यात येणार आहे. सामान्य प्रवासी आता आर्थिक गर्तेत सापडला आहे. कॉस्ट कटिंग, प्रवासाचा खर्च, वाढलेली महागाई याला सर्वजण कंटाळलेले आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी त्वरित लोकल सुरु करणे आवश्यक आहे. नाहीतर, फोर्ट येथील आझाद मैदानात आंदोलन करण्याची तयार सुरु केली आहे. 
- सुभाष गुप्ता,
अध्यक्ष, रेल यात्री परिषद 

Start a local for all passengers otherwise there will be agitation Railway Passengers Association demands

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com