शाब्बास BMC....शहरातील तेरा सिग्नलवरील पुरुषांऐवजी महिलांचे चित्र लावणार! वाचा सविस्तर बातमी

संजय घारपुरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मुंबईतील तेरा सिग्नलवरील पुरुषांच्याऐवजी महिलांचे चित्र लावण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील मार्गदर्शक खूणा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलमध्येही समानता आणण्याचे ठरवले आहे.

 

मुंबई ः मुंबई महापालिकेने महिलांना समान आधिकार आहेत, हे दाखवण्यास अक्षरशः रस्त्यावरुन सुरुवात केली. रस्त्यावरील मार्गदर्शक खुणा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलवरील पुरुषांची मक्तेदारी आता मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील तेरा सिग्नलवरील पुरुषांच्याऐवजी महिलांचे चित्र लावण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील मार्गदर्शक खूणा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलमध्येही समानता आणण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात झाली आहे. त्याद्वारे पुरुष आणि महिला समान आहेत, असेच दाखवले जाणार आहे. 

लॉकडाऊनमध्येही 'शुभमंगल सावधान' जोरात; चार महिन्यांत 556 जोडपी विवाहबद्ध....

महाराष्ट्राचे पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दादर येथे वसवण्यात आलेल्या रस्त्यांवरील मार्गदर्शक खूणा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलचे छायाचित्र ट्वीट केले आहे. आपण दादर परिसरातून गेलात तर तेथील चिन्ह पाहून तुम्हाला अभिमान वाटेल. मुंबई महापालिका प्रभागाने पुरुष आणि महिला समानता दाखवण्यासाठी एक सोपी कल्पना अमलात आणली आहे. तेथील सिग्नलवर आता महिलांचेही रेखाचित्र आहे, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे. 

त्यात रस्ता क्रॉस करण्याची जागा दाखवणाऱ्या ठिकाणी आत्तापर्यंत केवळ पुरुषाचेच रेखाचित्र असे. तिथे आता महिलांचेही रेखाचित्र आले आहे. त्याचबरोबर रस्ता क्रॉस करण्याबाबत असलेल्या सिग्नलवरही पुरुषांचेच रेखाचित्र झळकत असे, पण आता तिथेही महिलांचे रेखाचित्र असणार आहे. 
मुंबई महापालिकेने दादर आणि माहिम दरम्यानच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील तेरा सिग्नलवर महिलांचे रेखाचित्र आहे. या मार्गावर सिद्धीविनायक मंदीर, माहिम दर्गा, माहिम चर्चा, चैत्यभूमी आहे. महिलांची रेखाचित्र सिग्नल तसेच रस्त्यावरील मार्गदर्शक खुणांवर झळकवणारे मुंबई हे देशातील पहिले शहरच असावे. 

हॉटेल सुरू, मात्र ग्राहकांचा पत्ताच नाही; आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन थंडावल्याने फटका

जर्मनी, नेदरलँडस््मधील अनेक शहरात तसेच स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे महिलांचे रेखाचित्र सिग्नलवर आहे. पुरुष आणि महिला समान आहेत हे दाखवण्यासाठी मेलबर्न येथेही यास 2017 पासून सुरुवात झाली आहे.

------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: starting with a signal mumbai s dadar gets female figures on traffic lights