राज्यात अनलॉकसंदर्भात नवीन नियमावली जाहीर; चित्रपटगृहे सुरू करण्याला परवानगी

तुषार सोनवणे
Wednesday, 4 November 2020

. राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. 

मुंबई - राज्यात कोरोना संसर्ग सध्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये पुन्हा व्यवहार हळुहळू सुरूळीत होत आहेत. राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे. 

मुंबईतल्या हवेच्या स्तराची वाईट नोंद, सर्दी-खोकल्याच्या त्रासात वाढ

राज्य सरकार लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्याने शिथिल करीत आहे. बहुतांश व्यवहार सुरळीत होत आहेत. नवीन नियमावली नुसार राज्यातील चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे 50 टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी कोणतेही खाद्यपदार्थ आत नेण्याची परवानगी नसणार आहे.

योगा वर्ग तसेच इनडोअर खेळ टेनिस, बॅडमिंटनला परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी फिजीकल डिस्टंसिंगचे नियमांचे पालन करण्याचे बंधन असणार आहे. राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.

सरसकट लोकल प्रवासासाठी सामान्य प्रवासी प्रतिक्षेतच, राज्य आणि रेल्वे प्रशासनाकडून टोलवाटोलवी

या सर्व गोष्टी कंन्टेंमेंट झोनच्या बाहेर सुरू करण्याला परवानगी असणार आहे. कंन्टेंमेंट झोनमध्ये यासाठी परवानगी नाही. नाट्यगृहे, चित्रपटगृहांमध्ये मास्क, सॅनिटायझेशन अनिवार्य असणार आहे. परंतु अनेक दिवसांपासून असलेली मंदिरे खुली करण्याची मागणी राज्य सरकारकडून अद्याप तरी मान्य करण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State announces new regulations on unlock